Rahul Kul Sarkarnama
पुणे

Rahul Kul : बंद असलेली जनाई शिरसाई योजना पुन्हा सुरू करणार; आमदार राहुल कुल

‘‘आगामी काळामध्ये दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील वर्षानुवर्षे बंद असणारी जनाई शिरसाई योजना नव्याने सुरू करण्याची कार्यवाही पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजूर होणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

खुटबाव : ‘‘आगामी काळामध्ये दौंड तालुक्यातील दुष्काळी भागातील वर्षानुवर्षे बंद असणारी जनाई शिरसाई योजना नव्याने सुरू करण्याची कार्यवाही पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजूर होणार आहे. महायुती शासन ही योजना सुरू करण्यासाठी कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन आमदार राहुल कुल यांनी केले.

वासुंदे, जिरेगाव, हिंगणीगाडा, पांढरेवाडी व कुरकुंभ येथे आयोजित प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. या आमदार कुल म्हणाले, ‘‘या परिसरामध्ये ज्या तलावांना पाणीपुरवठा कमी असतो, त्या ठिकाणी बंद पाइपद्वारे जनाई शिरसाई योजनेचे पाणी देण्यात येईल.

फुरसुंगी बोगद्यामुळे अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे. त्यामुळे दरवर्षी जिरायती भागातील शेतीला पाच आवर्तने मिळणार आहेत.’’ यावेळी राजाभाऊ पाटील, राहुल शेवाळे उपस्थित होते. भाजपच्या कांचन कुल यांनी खामगाव येथील खामगाव गावठाण, तांबेवाडी, यादववाडी, शेलारवाडी, खेडेकरवस्ती या परिसरामध्ये पायी संवाद यात्रा काढली. गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी व महिलांनी या दौऱ्यामध्ये उस्फूर्त प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादीचे माघार घेतलेले उमेदवार वीरधवल जगदाळे म्हणाले, ‘‘राज्यामध्ये महायुती संघटितपणे निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादीने मला अधिकृत एबी फॉर्म दिला होता. महायुतीमध्ये बिघाडी होऊ नये म्हणून मी उभा राहिलो नाही. मी निवडणूक लढलो असतो तर, राज्यामध्ये इतर ठिकाणी महायुतीमध्ये अडचण झाली असती.

आमदार कुल यांनी मला माघार घेण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सकारात्मक प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला. भविष्यामध्ये आमदार कुल यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार आहे.’’ या बैठकीमध्ये आमदार राहुल कुल, महेश भागवत, गुरुमुख नारंग, नितीन दोरगे, नामदेव बारवकर, हरिश्चंद्र ठोंबरे आदी उपस्थित होते.

‘चुकीची भूमिका कोणीही मांडू नये’

चौफुला (ता. दौंड) येथे महायुतीची समन्वय बैठक पार पडली. दौंड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांनी वीरधवल जगदाळे यांचा मला पाठिंबा आहे, असे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना नागवडे म्हणाल्या, ‘‘माजी आमदार रमेश थोरात हे अनेकदा वेगवेगळे वक्तव्य करतात. भविष्यामध्ये चुकीची भूमिका कुणीही कुणाची मांडू नये. निवडणुकीमध्ये कोणी कोणाला पाठिंबा द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.’’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT