Bhimashankar cooperative sugar factory election
Bhimashankar cooperative sugar factory election 
पुणे

पावसाचा फटका : "भीमाशंकर" ची निवडणूक पुढे ढकलली

सुदाम बिडकर

पारगाव : दत्तात्रयनगर (पारगांव ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची (Bhimashankar cooperative sugar factory election) निवडणूक पुढे ढकलली आहे. पुणे जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रमा जोशी यांनी दिली. (Bhimashankar cooperative sugar factory election)

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या शिंगवे – रांजणी गटातील तीन जागांसाठी उद्या रविवार (ता.१७) मतदान होणार होते. ही मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. एकूण २१ जागांपैकी भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

शिंगवे – रांजणी गटात तीन जागांसाठी तुकाराम बाबुराव गावडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भीमाशंकर कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर हे तिन्ही विद्यमान संचालक रिंगणात असल्याने तीन जागांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार होते.

प्रशासनाच्या वतीने मतदानाची सर्व तयार पूर्ण करण्यात आली होती. तालुक्यात १४ मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. मतदान केंद्रावर मतपत्रिका व मतपेट्या नेण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था केली होती. मतदान अवघे एक दिवसावर आले असतांना राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन तसेच वाहतुक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे.

जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग घेता यावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्यावर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आदेशानुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही आहे त्या टप्प्यावर पुढे ढकलण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT