BJP leaders and elected corporators attend a crucial meeting in Pune ahead of group leader selection and mayoral decision, with Devendra Fadnavis playing a decisive role. Sarkarnama
पुणे

Pune PMC BJP : भाजपच्या गटनेता निवडीचा मुहूर्त ठरला; CM फडणीस यांचा कॉल कोणाला येणार? महापौरपद हुकलेल्यांपैकी एकाला मिळणार संधी?

PMC Mayor News : पुणे महानगरपालिकेत भाजपचा गटनेता व महापौर निवडीसाठी 27 जानेवारीला महत्त्वाची बैठक होणार असून अंतिम निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचा शिक्का राहणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महानगरपालिका निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता पुढील टप्प्याकडे वाटचाल सुरू केली आहे. भाजपने 119 नगरसेवक निवडून आणले असून, शहरात सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून त्यांची सत्ता निश्चित झाली आहे. याच सत्तास्थापनेसाठी भाजपच्या सर्व 119 नगरसेवकांची महत्त्वाची बैठक 27 जानेवारीला पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.

सर्व नगरसेवकांची बैठक

या बैठकीत पुणे महानगरपालिकेसाठी भाजपचा गटनेता ठरवण्यात येणार आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांसोबत स्थानिक नेतेही या बैठकीत सहभागी होणार असून, पक्षाच्या अंतर्गत चर्चा आणि निर्णय प्रक्रिया येथे पूर्ण होईल. त्यानंतर निवडण्यात आलेली काही नावांचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर अंतिम निर्णय हा फडणवीस घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष

गटनेता निवडीसोबतच महापौर आणि उपमहापौरपदासाठीही अंतिम तयारी सुरू आहे. उपलब्ध माहितीनुसार, 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे महानगरपालिकेच्या विशेष सभेत भाजपचा महापौर निवडला जाणार आहे.

यंदा महापौरपद महिला राखीव असल्याने महिला नगरसेवकांमधूनच नवे महापौर निवडले जाण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत या पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असून, अनेक नावे चर्चेत आहेत.

भाजपच्या या निर्णायक बैठकीमुळे पुण्याच्या महानगरपालिकेतील (PMC) सत्ता रचना लवकरच स्पष्ट होईल. त्यानुसार महापौर सह स्थायी समिती अध्यक्ष उपमहापौर आणि शहर सुधारणा कमिटीचे लाभाचे पद कोणाला मिळणार यावर शिक्कामार्फत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT