Pune BJP News : Asha Buchke : Sharad butte Patil : Rahul Kul :
Pune BJP News : Asha Buchke : Sharad butte Patil : Rahul Kul : Sarkarnama
पुणे

Pune BJP News : भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी ‘या’ चार जणांमध्ये होणार चुरस !

सरकारनामा ब्यूरो

Pune News : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदाबरोबरच पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षांची निवड लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. गणेश भेगडे हे पक्षाचे सध्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला असून, नवे अध्यक्ष लवकरच निवडला जाणार आहे. नव्या नावांमध्ये प्रामुख्याने आमदार राहुल कुल (Rahul Kul), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील, आशाताई बुचके (Asha Buchake) आणि सध्याचे संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे.

आमदार कुल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जातात. मात्र, चारच दिवसांपूर्वी त्यांच्यावर भीमा पाटस सहकारी कारखान्यात 500 कोटी रुपयांया घोटाळ्याचा आरोप शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद बुट्टे पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत.जिल्हा परिषदेच्या कामाचा अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. त्याचबरोबर राजकारण राजगुरुनगर तालुक्यातला राजकारणात त्यांचा चांगला अभ्यास आहे. भाजपच्या पक्ष संघटनेतदेखील ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत.आमदार कुल यांच्याप्रमाणेच बुट्टे पाटील देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशा बुचके या जिल्हा परिषदेत माजी सदस्य आहेत. शिवसेनेतून सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरदेखील त्यांच्या पदरात अद्याप यश आलेलं नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्या अनेक वर्ष काम करतायेत. लढाऊ कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे.

जिल्हाध्यक्षांच्या स्पर्धेत विद्यमान संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांच्या नावाचीदेखील चर्चा आहे. ॲड. खांडरे हे मूळ संघ स्वयंसेवक आहेत.संघाच्या अधिवक्ता परिषद या वकीलांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.राजगुरूनगर सहकारी बँकेवर तज्ञ संचालक तसेच शिरूरचे माजी आमदार बाबूराव दौंडकर स्मारक समितीचे ते अध्यक्ष आहेत.पक्ष संघटनेत अनेक वर्ष ते सक्रिय आहेत. सध्या जिल्हा संघटन सरचिटणीस म्हणून पाहत आहेत.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस प्राबल्य पाहता भाजपाला या पुढच्या काळातदेखील खूप संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे स्वत:चा जिल्हा परिषद गट किंवा विधानसभा मतदारसंघापलीकडे जाऊन जिल्ह्याच्या संघटनेवरती पकड असलेल्या आणि संघटनेसाठी वेळ देणारा कार्यकर्ता या पुढच्या काळात जिल्हाध्यक्ष करण्यात यावा, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. येत्या दोन वर्षात लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ज्या कुणाकडे ही जबाबदारी येईल, त्यांच्यासाठी जिल्हाध्यक्षपद हे मोठे आव्हान असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT