Pune By-Election :  Sarkarnama
पुणे

Pune By-Election : 'चिंचवड'ला तीन उमेदवारी अर्ज दाखल, तर 'कसब्या'ची अजूनही पाटी कोरीच!

Pune By-Election : एकाच उमेदवाराने दोन अर्ज दाखल केले.

सरकारनामा ब्यूरो

Pune By-Election : पुण्यातील चिंचवड व कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांचे निधन झाल्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकीत उमेदवारीवरून मोठे राजकीय नाट्य घडताना दिसून येत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असतानाच, काँग्रेससोबतच शिवसेना व राष्ट्रवादीकडून उमेदवारी इच्छुक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.

आता या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज दोन उमेदवारांकडून, तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. मात्र कसबा विधानसभा मतदारसंघात अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.

चिंचवड मतदारसंघासाठी कालपासून (दि. ३१ जाने) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली. पण, पहिल्या दिवशी एकही अर्ज आला नव्हता. तर, कसबा पेठमध्ये आजपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र येथेही पहिल्या दिवशी पाटी कोरी राहिली. मात्र भाजप, काँग्रेस व इतरांकडून जवळपास २१ अर्ज नेण्यात आले आहेत.

चिंचवडला मिलिंद कांबळे यांनी अपक्ष म्हणून एक, तर अॅड अनिल सोनवणे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवारच अद्याप ठरलेलेच नसल्याने त्यांच्या उमेदवारीची प्रतिक्षा आहे .

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT