Pune : चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्धघाटनाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी 'लेटर बॉम्ब'टाकून धमाका केला. समाज माध्यमांवर पोस्ट लिहित त्यांनी स्थानिक नेतृत्वावर निशाणा साधला. पुलाच्या उद्धघाटन कार्यक्रमाला त्यांना डावलण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. मेधा कुलकर्णी यांनी ‘निराश’ असं ट्वीट करत उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे.
आज पुलाच्या उद्धघाटनप्रसंगी त्या उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांची नाराज दूर करण्यास पक्षश्रेष्ठींना यश आले का अशी चर्चा रंगली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे, कार्यक्रमांनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या घरी जाऊन चर्चा करणार असल्याचे समजते.
समाज माध्यमातून मेधाताईंनी काल संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नीलम गोर्हे, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह पुण्यातील आमदार व मेधा कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. मेधा कुलकर्णी यांनी यावेळी बोलणे टाळून कार्यक्रमानंतर बोलू असे सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
"माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही नाही, पण आता दुःख मनात मावत नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलावे वाटले. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली आणि खूप वाईट वाटले," असे टि्वट मेधा कुलकर्णी यांनी केले आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.