Pune News : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. क्लासमधील ऑफिस बॉयने स्टोअर रूममध्ये मुलाला नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक स्पर्श करून लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.
आरोपीचे नाव विकास गायकवाड (३५ वर्षे) असून, मार्केट यार्ड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या आठवीत शिकत असलेल्या मुलगा गेल्या दोन-तीन वर्षांपासून मार्केट यार्ड परिसरातील या कोचिंग क्लासमध्ये नियमितपणे शिक्षणासाठी जात होते.
काही दिवसांपूर्वी आरोपी विकास गायकवाडने मुलाला स्टोअर रूममध्ये नेले आणि लैंगिक छळ सुरू केला. या प्रकारात मुलाच्या प्रायव्हेट पार्टचे फोटो काढल्याचा सांगितलं जात आहे.
घटना घडल्यानंतर मुलगा घरी आला आणि रडू लागला. क्लासला जायला नकार दिल्याने वडिलांनी चौकशी केली. मुलाने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी थेट मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.