Pune Collector Office Dharmendra Sonkar FIR  sarkarnama
पुणे

Pune Collector Office : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास 20 लाखांचा गंडा, तोतयावर गुन्हा दाखल; मागासवर्गीय आयोगाचे प्रतिनिधी म्हणून..., सत्य समोर येताच खळबळ

Dharmendra Sonkar FIR : मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Roshan More

Pune News : मागासवर्गीय आयोगाचा प्रतिनिधी असल्याचे भासवत एक जणाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक केली. सरकारी सुविधा घेऊन २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव धर्मेंद्र ब्रिजलाल सोनकर (रा. पिंपरी) असे आहे.

धमेंद्र याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचा प्रतिनिधी असल्याचे भासवून बनावट लेटर हेड तयार करून त्याद्वारे गंडा घाताल. बनावट पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून लोणावळ्यातील शासकीय विश्रामगृहाचा वापर,तसेच पुणे ग्रामीण पोलिसांचे 'एस्कॉटिंग' घेतल्याचा आरोप आहे.

धर्मेंद्र सोनकर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या महाराष्ट्र व गोवा राज्याचा प्रतिनिधी नसतानाही त्याच पदावर असल्याचे भासवले.त्यासाठी त्याने आयोगाच्या नावाने बनावट लेटरहेड तयार केले.ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करून त्याआधारे शासकीय विश्रामगृहाचा अनधिकृतपणे वापर केला.

पुणे ग्रामीण पोलिसांचे एस्कॉटिंग आणि अन्य सरकारी सुविधांचाही लाभ घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी यंत्रणेची दिशाभूल करून जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित सरकारी विभागांची २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT