पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली असून संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अवघ्या 3 वर्षांच्या निरागस मुलीवर 65 वर्षीय विकृत व्यक्तीने अत्याचार करून तिची निर्दयी हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या अमानुष घटनेमुळे गावात प्रचंड संताप व्यक्त होत असून समाजात माणुसकी उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ही चिमुकली सुट्टीसाठी आपल्या आजीकडे नसरापूर येथे आली होती. दुपारच्या वेळी ती घराजवळील राम मंदिर परिसरात खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला फूस लावून जवळच्या गोठ्यात नेले. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटना लपवण्याच्या उद्देशाने आरोपीने मुलीचा मृतदेह गोठ्यातच शेणाखाली झाकून ठेवला आणि तेथून पळ काढला. बराच वेळ मुलगी घरी परतली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. स्थानिक नागरिकही शोधमोहीमेत सहभागी झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मुलगी एका व्यक्तीसोबत जात असल्याचे दिसले. त्यानुसार शोध घेत असताना गोठ्यात तिचा मृतदेह सापडला आणि गावात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, संशयित आरोपी गावाजवळील नदी परिसरात आढळून आला. संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी कठोर शिक्षेची मागणी केली आहे. “आरोपीला आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले. काही काळासाठी रास्ता रोकोही करण्यात आला. या घटनेमुळे सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे. आता या चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.