Bandu Andekar,Ayush Komkar murder  Sarkarnama
पुणे

Bandu Aandekar: गणेश पेठ फिश मार्केटमधील 'बडा मासा' उकळत होता कोट्यवधीची खंडणी; आकडा ऐकून पोलिस चक्रावले!

Pune police crackdown on Bandu Aandekar illegal construction, hoardings: बंडू आंदेकर याचे बेकायदेशीर बांधकाम आणि अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सुरू आहे.ही कारवाई सुरू असतानाच आंदेकर टोळी मार्फत करण्यात येणाऱ्या खंडणी बाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबीयांसह टोळीच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी काही आरोपी पोलिस कोठडीत, तर काही न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, पुणे महानगरपालिका आणि पोलिसांनी आंदेकर टोळीला जोरदार दणका दिला आहे.

नाना पेठेतील आंदेकरांचे बेकायदेशीर बांधकाम आणि अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याची कारवाई सुरू आहे. सोमवारी सकाळपासून पुणे महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई सुरू असतानाच आंदेकर टोळी मार्फत करण्यात येणाऱ्या खंडणी बाबत मोठी माहिती समोर आली आहे.

पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याची हत्या झाली होती. वनराज आंदेकरच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, गणेशोत्सवात घडलेल्या या हत्याकांडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी आतापर्यंत बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) याच्यासह १५ आरोपींना अटक केली आहे, यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या तीन महिला न्यायालयीन कोठडीत असून, उर्वरित १२ आरोपींना २९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी बंडू आंदेकरच्या घराची झडती घेतली असता ७७ तोळे सोन्याचे दागिने आणि अडीच लाख रुपये रोख, असा सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. तसेच, पोलिसांनी आरोपींची २७ बँक खाती गोठवली आहेत.

त्यानंतर आता गेल्या दहा वर्षांपासून गणेश पेठ येथील मासे मार्केट मधील व्यापाऱ्यांकडून बंडू आंदेकरने तब्बल 20 कोटीहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. याबाबत आंदेकर कुटुंबातील सहा जणांविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजवून बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर , अभिषेक उदयकांत आंदेकर , सोनाली वनराज आंदेकर आणि शिवराज उदयकांत आंदेकर यांनी दरमहा 15 ते 20 लाख रुपये खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. १२ वर्षापासून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळल्याचे तपासात उघड झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT