Pune News : पुण्यातील सुतारदरा परिसरात 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली होती. हल्ल्यानंतर शरद मोहोळला (Sharad Mohol) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते. आता मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या घराजवळच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पुणे शहराला हादरवणाऱ्या घटनेला रविवारी (ता.5) एक वर्ष पूर्ण होत आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शरद मालपोटे आणि संदेश कडू यांना अटक केली आहे. दोन पिस्तुलही त्यांनी जप्त केली आहे.
पुणे पोलिसांनी(Po कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुन्हे शाखेने सोळा आरोपींविरुद्ध तब्बल दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
शरद मोहोळचा खून झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळजवळ मोटारीचा पाठलाग करून आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच काडतुसे आणि दोन मोटारी ताब्यात घेतल्या होत्या. जमिनीच्या आणि आर्थिक वादातून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आत्तापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह अन्य आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.