Vanraj Andekar Shot Dead Sarkarnama
पुणे

Vanraj Andekar Shot Dead: VIDEO वनराज आंदेकर यांच्या हत्येचा थरार; नेमकं काय घडलं?

NCP Leader Vanraj Andekar Shot Dead In Pune: वनराज यांची हत्या होण्यापूर्वी नाना पेठेत काय घडलं होते, यांची माहिती समोर येत आहे. त्याआधारे पुणे पोलिस तपास करीत आहेत. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार आणि कोयत्याचा हल्ल्याचा थरार नाना पेठेत झाला.

Mangesh Mahale

NCP Corporator Vanraj Andekar Shot Dead in Nana Peth: विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. वनराज यांच्या हत्येप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. वनराज यांची हत्या होण्यापूर्वी नाना पेठेत काय घडलं होते, यांची माहिती समोर येत आहे. त्याआधारे पुणे पोलिस तपास करीत आहेत.

काल (रविवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोळीबार आणि कोयत्याचा हल्ल्याचा थरार नाना पेठेत झाला. वनराज यांना केईम रुग्णालयात दाखल केले होते, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वनराज यांच्यावर हल्ला होण्यापूर्वीच ते ज्या ठिकाणी थांबले होते त्या परिसरातील (डोके तालीम,नाना पेठ) अचानकपणे लाईट गेली होती. काही वेळाने वीज प्रवाह पूर्ववत झाला. हल्ल्यांच्या वेळी नेमकी बत्ती गुल कशी झाली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संशय व्यक्त करण्यात येत आहे. डोके तालीम येथे अंधारात फायदा घेऊन हल्लेखोरांनी वनराज यांचा 'गेम'केला. हल्लेखोर अंधारात पसार झाले.

तीन जणांना अटक

गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. जयंत कोमकर, सोमनाथ कोमकर. सोमनाथ गायकवाड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोण होते वनराज आंदेकर

  • गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळीचा पुण्यातील अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये हात आहे.

  • प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खून प्रकरणी वनराज यांचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.

  • वनराज यांची आई राजश्री आंदेकर या नगरसेवक होत्या.

  • 2007 आणि 2012 अशा सलग दोन टर्म त्यांनी नगरसेवक पद भुषवलं होतं.

  • 2017 ते 2022 या कालावधीत वनराज आंदेकर नगरसेवक होते.

  • वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेसुद्धा नगरसेवक होते.

  • वत्सला आंदेकर या पुण्याच्या महापौर होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT