Pune Crime: Shocking Assault on Youth, Video Goes Viral Sarkarnama
पुणे

Pune Crime News: पुण्यात अमानुषतेचा कळस! तरुणाला मारहाण करून शेण खाऊ घातले; व्हिडीओ व्हायरल

Pune Crime News Truck Driver Assaulted Forced to Eat Dung: पुण्यात ट्रकचालकाला मारहाण करून शेण खाऊ घातल्याची धक्कादायक घटना. पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. सविस्तर बातमी वाचा.

Sudesh Mitkar

Pune News, 10 March 2026: पुण्यात गोरक्षकांच्या नावाखाली एका ट्रक चालक तरुणाला अमानुष मारहाण करून त्याला चक्क शेण खाऊ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, म्हशीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला थांबवून त्याच्यावर धार्मिक टीकाटिप्पणी करीत चालकाला शेण खाऊ घातल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना ६ मार्चला आंबेगाव परिसरात घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दखल घेवून गुन्हा दाखल केला आहे. बिपाशा ऊर्फ आकाश राजू माणिकम (रा. गुरूनानक कॉलनी, कात्रज) हेमंत गायकवाड (रा. आंबेगाव) विराज सोले यांच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गणेश शेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

म्हशी घेऊन वाहनचालक जात असताना आरोपींनी त्याला ६ मार्चला पहाटेच्या सुमारास अडविले. त्यानंतर पोलीस मार्शलच्या मदतीने त्याला ठाण्यात आणले होते. याप्रकरणी म्हैस वाहतूक आणि ट्रकचालकाला मारहाण अशा दोन अदखलपात्र नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, पोलीस अंमलदार शेंडे यांना इन्स्टाग्रामवर व्हिडीओ दिसून आला. त्यामध्ये आरोपी बिपाशा ऊर्फ आकाश, हेमंत, विराज यांनी ट्रकचालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. आरोर्पीनी चालकाला शेण खाऊ घातले. धार्मिक टिप्पणी करीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आंबेगाव पोलीस तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT