Yerwada Jail Sarkarnama
पुणे

Pune Crime News|धक्कादायक! येरवडा कारागृहातील कैद्याकडे चरस आढळले; पोलिसांकडून तपास सुरू

Drugs in Yerwada Jail : तपासणी करण्यात आली तेव्हा त्यांच्याकडे २५ ग्रॅम चरस आढळून आलं.

Chetan Zadpe

Pune Crime News : पुण्यातील येरवडा कारगृहातील कैद्याकडे चक्क चरस आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. येरवडा कारागृहात कैदेत असलेल्या शुभम पास्ते याला पोलिस सुनावणीसाठी न्यायालयात नेलं जात होतं. सुनावणी पार पडल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात आणलं गेलं. त्याचवेळी त्यांच्याकडे २५ ग्रॅम चरस आढळून आलं आहे. यामुळे आता खळबळ उडाली असून, कारागृह प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण पु्ण्यात गाजत असतानाच हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कारागृहात कैद्यांवरती खरंच लक्ष दिलं जातं का? त्यांनी त्या ठिकाणी कैद्यांना सुधारणेसाठी ठेवलं जातं का? की कारागृहच मोठ्या गुन्ह्यांचे केंद्र बनलेले आहे? असे प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने विचारले जात आहेत.

शुभम पास्ते हा जो आरोपी आहे, त्याला एका गुन्ह्यामध्ये न्यायालयात सुनावणीसाठी हजर करायचं होते. पोलिस त्याला येरवडा कारागहातून घेऊन पुण्याच्या सत्र न्यायालयात आले, सुनावणी झाली आणि त्यानंतर त्याला पुन्हा पाेलिस येरवडा कारागृहात घेऊन गेले. प्रवेशद्वारावर त्याची तपासणी करण्यात आली, तेव्हा त्याच्याकडे २५ ग्रॅम चरस आढळून आलं. सुनावणीसाठी नेत असतानाच त्याच्याकडे हे चरस कुणीतरी दिलं आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या बंदोबस्तात घडलेला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT