Pune DJ Controversy | Vidyanand Bapat Assault Sarkarnama
पुणे

Vidyanand Bapat : धक्कादायक! पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण

Pune DJ controversy : सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाला आळा घालावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी बापट यांची मागणी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते सध्या पुण्यासह राज्यभरात चर्चेत आले आहेत. दरम्यान, डीजेविरोधातील त्यांच्या भूमिकेला काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचेही समोर आले आहे.

Jagdish Patil

Pune News, 03 Sep : पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजे आणि कर्णकर्कश आवाजाविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील टिळक रोड परिसरातील कशाळे चौकात ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवात डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध करत विद्यानंद बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली आहे.

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणाला आळा घालावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते सध्या पुण्यासह राज्यभरात चर्चेत आले आहेत. दरम्यान, डीजेविरोधातील त्यांच्या भूमिकेला काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत असल्याचेही समोर आले आहे.

अशातच कशाळे चौक परिसरात नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना काही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी बापट यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील नेमके कारण काय होते आणि मारहाण करणारे कोण होते, याबाबत अधिक माहिती समोर येणे बाकी आहे.

पुण्यात सध्या गणेशोत्सवातील डीजे, लाऊडस्पीकर आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. डीजेविरोधात नागरिकांकडून आंदोलनेही करण्यात आली आहेत. दरम्यान, गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT