Pune Drugs Case Sarkarnama
पुणे

Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात आता थेट ईडीची उडी; 'सर्व आरोपींची...'

Chaitanya Machale

Pune News : पुणे शहरात उघडकीस आलेल्या ' इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेट'मध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणांमध्ये ड्रग्ज खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात हवालामार्फत व्यवहार झाल्याचे पोलिस तपासात समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) कडून मागविण्यात आली आहे. (Latest Crime News)

या ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींची माहिती देण्यास ईडीने पुणे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या ड्रग्ज प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. ईडीने सर्व आरोपींच्या मालमत्तेची माहिती देण्यास सांगितली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून काही मोठ्या गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. ईडीने पुणे पोलिसांना याबाबत पत्र पाठवलं आहे. हे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपींच्या मालमत्तेचा तपास करायला सुरुवात केली आहे. या ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची सगळी कागदपत्रे ईडीने पोलिसांकडून मागवली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन आठवड्यांपूर्वी पुणे शहरासह देशातील विविध भागात छापे टाकून हे इंटरनॅशनल ड्रग्जचे रॅकेट उघडकीस आणले होते. यामध्ये तब्बल 3500 कोटी रुपयांचे ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 11 आरोपींना विविध भागातून अटक केलेली आहे.

यामध्ये वैभव ऊर्फ पिंट्या माने (40), अजय करोसिया (35), हैदर नूर शेख (40), भीमाजी परशुराम साबळे (46), केमिकल इंजिनिअर युवराज बब्रुवान भुजबळ ( 41), आयुब अकबरशहा मकानदार (48), दिल्लीतून संदीप राजपाल कुमार (39), दिवेष चरणजित भुथानी (38), संदिप हनुमानसिंग यादव (32) व देवेंद्र रामफुल यादव (32) व पश्चिम बंगालमधन सुनील वीरेंद्रनाथ बर्मन (42) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत पुणे पोलिस ज्या भागात हे ड्रग्ज तयार केले जात होते, त्या कारखान्यात पोहोचले. पुणे शहरापासून 45 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरकुंभ एमआयडीसीमध्ये एका कारखान्यात ड्रग्ज तयार करण्याचे उद्योग सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. विशेष म्हणजे एक औषध तयार करण्याच्या कारखान्यात हा संपूर्ण उद्योग केला जात होता. देशातील विविध शहरांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर हे ड्रग्ज विकलं जात होते. मिठाच्या पुड्यातून विक्री करण्यात येत असलेला ड्रग्ससाठादेखील (Drug Case) पोलिसांनी जप्त केला होता.

पुणे पोलिसांनी (Pune Police) कुरकुंभ एमआयडीसीमधील या कंपनीवर छापा टाकल्यानंतर या ट्रकचे कनेक्शन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर असल्याचे समोर आले होते. देशातील विविध भागात हे ड्रग्ज सर्रासपणे विकले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. विमानाच्या माध्यमातून हे ड्रग्ज थेट लंडनपर्यंतदेखील गेले असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात स्पष्ट झाले आहे. या आंतरराष्ट्रीय ट्रक प्रकरणाची वाढती व्याप्ती लक्षात घेता आणि यामध्ये झालेला मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार पाहता आता या प्रकरणात ईडीनेदेखील उडी घेतली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT