Pune Police News Sarkarnama
पुणे

Pune News: माजी उपमहापौराच्या सुपुत्राची अरेरावी? दुचाकी चालकाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी...

आबा बागुल यांच्या राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नाही, असे तक्रारदार यांचं म्हणणं आहे. आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत बागुल यांनी आपल्याला मारहाण केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाने दुचाकी चालकाला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदारानं केली आहे. पण गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्याने तक्रारदारानं पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला.

हेमंत बागुल यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, त्यांनी मला गोळी मारण्याची धमकी दिल्याचे सय्यद यांनी पोलिस आयुक्तांना सांगितलं आहे.

आबा बागुल यांच्या राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होत नाही, असे तक्रारदाराचं म्हणणं आहे. आबा बागुल यांचे सुपुत्र हेमंत बागुल यांनी आपल्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे, हेमंत बागुल यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार फय्याज सय्यद यांनी बंडगार्डन पोलिसांकडे दिली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

यावर हेमंत बागुल यांनी खुलासा केला आहे. "माझे वाहन सिग्नल लागल्याने थांबलेले असताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करून डाव्या बाजूने ओव्हरटेक करून त्या व्यक्तीने माझ्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यातून त्याला जाब विचारला असता, त्याने अरेरावी केली. त्याने दादागिरी करुन शिवीगाळही केली.त्यातून हे घडले. ज्यावेळी त्याला कळले की मी आबा बागुल यांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याने प्रसिद्धीपोटी किंवा प्रतिमा मलीन करण्यासह आर्थिक लाभापोटी हा खटाटोप केला आहे, असे हेमंत बागुल यांनी माध्यमाना कळविले आहे.

नेमकं काय घडलं?

मंगळवार पेठेतील एका पेट्रोल पंपासमोर हा प्रकार घडला. सय्यद हे मालधक्का चौकातून मंगळवार पेठेच्या दिशेने जात होते. त्यावेळी पेट्रोल पंपासमोर एक लाल गाडी उभा होती. गाडीतील चालकाने अचानक दरवाजा उघडल्याने सय्यद यांची गाडी बाजूला असणाऱ्या काळ्या गाडीवर आदळली. गाडीला डेंट गेल्याने हेमंत बागुल यांनी सय्यद यांना मारहाण केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT