Pune Ganesh festival dry day  Sarkarnama
पुणे

Pune Ganeshotsav : गणेशोत्सवाच्या काळात पुण्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय!

Pune Ganesh festival dry day : गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात 27, आणि 31 ऑगस्ट तसंच 2, 6 आणि 7 सप्टेंबर या 5 दिवसांच्या कालावधीत, खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संपूर्ण मद्यविक्री बंदी (दारूबंदी) लागू करण्यात आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 27 Aug : गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात 27, आणि 31 ऑगस्ट तसंच 2, 6 आणि 7 सप्टेंबर या 5 दिवसांच्या कालावधीत, खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संपूर्ण मद्यविक्री बंदी (दारूबंदी) लागू करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये संपूर्ण गणेशोत्सव काळामध्ये ड्रायडेची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता त्या आदेशामध्ये सुधारणा करण्यात आली असून आता 5 दिवस ड्राय डे असणार आहे.

तसेच, संपूर्ण पुणे जिल्ह्यात गणेश चतुर्थी (27 ऑगस्ट) आणि अनंत चतुर्दशी (6 सप्टेंबर) या दोन दिवशी ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने घेतला आहे.

मध्यवर्ती पुण्यात अनेक मानाचे आणि प्रमुख गणपती मंडळे असून, त्यांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने गणेशभक्त आणि नागरिकांची गर्दी होते. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने मद्यविक्रीवर निर्बंध घातले आहेत.

गणेश चतुर्थीला श्री गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुका होतात. या दोन्ही दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारूची दुकाने बंद राहतील. तसेच, 7 सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व मद्यविक्री केंद्रे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याशिवाय, ज्या भागात 5 व्या आणि 7 व्या दिवशी विसर्जन मिरवणुका आयोजित केल्या जातात, त्या भागातील दारूची दुकानेही त्या-त्या दिवशी बंद राहतील. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दारूबंदी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सव हा पुण्यातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव असून, यावेळी शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. या काळात गणेशभक्तांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT