pune Ganesh Visarjan
pune Ganesh Visarjan sarkarnama
पुणे

अशी असेल पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सरकारनामा ब्यूरो

Pune Ganesh Visarjan : पुणे : महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक व लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९. ३० वाजता महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. अलका टॉकीज चौकात महापालिकेतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना येथे सन्मानित केले जाणार आहे.

गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, कंटेनर, निर्माल्य कलश, कीटकनाशक फवारणी, विसर्जन घाटावर अग्निशमन दल कर्मचारी व्यवस्थापन, घाटावर औषध फवारणी, विसर्जन घाटावर तसेच नदी, तलाव, विहिरी नसलेल्या परिसरात विसर्जन हौद, लोखंडी टाक्याची सोय करण्यात आली आहे.

तसेच जीवरक्षकांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी यांची दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही पालिकेकडून करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार मंडप, बॅरिकेडस उभारण्यात आले आहे. अलका टॉकीज चौक, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, नारायण पेठ, माती गणपतीजवळ मंडप व स्टेज टाकण्यात आले आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे, फिरती स्वच्छतागृहांचीही तयारी करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाची तयारी

डेक्कन जिमखाना व लक्ष्मी रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालयाजवळ विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत उपचारासाठी वैद्यकीय पथ नियुक्त असणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्स व वाहनचालक यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. गुलालामुळे हवेचे प्रदूषण होऊन नागरिकांना डोळे व श्वसनाचे विकार होतात. नागरिकांनी गुलाल चेहऱ्यास लावण्याचे टाळून तो फक्त कपाळावर लावावा, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गुलाल अंगावर फेकू नये. गुलाल डोळ्यात गेल्यास पाण्याने स्वच्छ करावे. डोळ्याची आग होणे व चुरचुरणे चालू राहिल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन उपाययोजना कराव्यात, शक्यतो नैसर्गिक रंगाचा वापर केलेल्या गुलालाचा वापर करावा.

असा असेल पोलिसांचा बंदोबस्त

अतिरीक्त पोलिस आयुक्‍त - 4

पोलिस उपायुक्त - 10

सहाय्यक पोलिस आयुक्त - 21

वरिष्ठ पोलिस निरीक्षक - 55

पोलिस उपनिरिक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक - 379

पोलिस कर्मचारी- 4 हजार 579

अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन होणारी मंडळे व घरगुती गणपती

-सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे -2 हजार 969

-घरगुती गणपती- 2 लाख 22 हजार 977

आत्तापर्यंत झालेले गणेश विसर्जन सद्यस्थिती

-1 ते 7 सप्टेंबर पर्यंत गणेश विसर्जन झालेली सार्वजनिक मंडळे- 333

पोलिसांची असणार मिरवणुकीवर विषेश नजर

विसर्जन मिरवणुकीचे पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण

विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

गर्दीच्या ठिकाणी वृद्ध, महिला, बालकांवर विशेष लक्ष

चोरी, छेडछाड टाळण्यासाठी पोलिसांची विशेष पथके सक्रीय असणार आहेत.

विसर्जन मार्गावर नागरिकांसाठी मदत केंद्र असणार आहेत.

इथे साधा संपर्क करा

संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तु आढळल्यास त्वरीत संपर्क साधा- 112 पोलिस नियंत्रण कक्ष

अग्निशामक दल -101

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT