Swati Mohol Sarkarnama
पुणे

Sharad Mohol Wife : शरद मोहोळच्या हत्येनंतर पत्नी स्वाती यांना मुन्ना पोळेकरची धमकी?

Sunil Balasaheb Dhumal

Pune Crime News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येला महिना पूर्ण होत असतानाच त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांनाही धमकीचा मेसेज आला आहे. या मेसेजमुळे पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत असून मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोथरूड भागातील सुतारदरा परिसरात शरद मोहोळ (Sharad Mohol) यांची गेल्या महिन्यात गोळ्या झाडून हत्या झाली आहे. त्याच्यावर मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी गोळ्या झाडल्या होत्या. कालांतराने त्या हत्येमागे गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे असल्याचे तपासात स्पष्ट झाले. मोहोळच्या हत्येला एक महिना पूर्ण होत नाही तोच त्याची पत्नी स्वाती मोहोळ यांना धमकीचा मेसेज आला आहे.

शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने बनवलेल्या अकाऊंटवरून हा मेसेज आला आहे. त्या अकाऊंटवरून स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तसेच स्वाती यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टही केली आहे. सध्या पोळेकर पोलिसांच्या ताब्यात आहे. मग त्याच्या नावाने कुणी अंकाऊट बनवून स्वाती यांना धमकी दिली, याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, शरद मोहोळ हत्या प्रकरणात जवळपास 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य सूत्रधार असलेल्या गणेश मारणे हा फरार होता. त्याच्या शोधात पोलिस होते. तो संगमनेर परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने चक्र फिरवले. पोलिस आल्याची कुणकुण लागताच मारणेने पळ काढाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. आता शरद मोहोळ याच्या पत्नीला पोळेकराच्या अंकाऊटवरून आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीने पोलिस अलर्ट झाले आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT