Pune Graduate Constituency election candidates: डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजप सह राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये या जागेवरून उमेदवारी कोणत्या पक्षाकडे जाणार?
यावरून सध्या रस्सीखेच सुरू असून मतदार नोंदणी वरच उमेदवारीचा कल पक्षांकडे झुकणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पदवीधर नोंदणीत आघाडी घेतली जात असून भाजपची यंत्रणा सैल झाल्याचे चित्र आहे. सध्या या मतदारसंघावर भाजपने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मात्र त्या दृष्टीने अद्याप हालचाली थंड असल्याचे चित्र आहे.
पुणे पदवीधर मध्ये महायुतीमध्येच उमेदवारीवरून रस्सीखेच निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून या जागांवर दावा केला जात आहे. भाजपकडून शरद लाड तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून भैया माने हे पदवीधर साठी इच्छुक आहेत. सध्याच्या घडीला आपापल्या स्तरावर पदवीधर नोंदणी सुरू आहे.
पक्षीय पातळीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून आतापर्यंत 90 हजार पेक्षा जास्त पदवीधरांची नोंदणी झाली असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर भाजप आतापर्यंत 80 हजारपर्यंत पोहचला असल्याचे चित्र आहे. तर भाजपकडून इच्छुक असलेल्या शरद लाड यांच्याकडून जवळपास 80 हजार नोंदणी केल्याचा दावा केला जात आहे.
आठ दिवसांपूर्वी इचलकरंजी दौऱ्यावर असताना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघावर भाजपचाच दावा असल्याचे स्पष्ट केलं होतं. शिवाय शिक्षक मधून इच्छुक असलेले कौस्तुभ गावडे यांना सोबत घेऊनच त्यांचा दौरा सुरू आहे. अशा परिस्थितीत पदवीधर नोंदणीकडे अधून मधून माहिती घेतात. पण प्रत्यक्ष नोंदणीत भाजपकडून भाजपकडून आघाडी नाही.
दरम्यान, इकडे महाविकास आघाडीमध्ये देखील पुणे पदवीधर वरून अद्याप शांतताच आहे. सांगलीतून श्वेता देशमुख या महायुतीकडून पदवीधर साठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावर बरेचसे गणित अवलंबून आहे. जर उमेदवारी भाजपकडे गेले तर बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
12 जानेवारी 2026 पर्यंत
पुणे - 61071
सातारा - 41377
सांगली -75958
कोल्हापूर - 90786
सोलापूर - 36864
सोलापूर - 1543 ( 39 हजार 407)
सातारा - 1993 ( 43 हजार 330)
सांगली - 751 (76 हजार 709)
कोल्हापूर - 592 ( 91 हजार 378)
पुणे - 4193 (65 हजार 264)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.