Pune Graduate Teacher Voter Registration Sarkarnama
पुणे

Pune Graduate Teacher Voter Registration : पुणे पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी पोर्टल बंद; अंतिम मुदतीपूर्वीच प्रक्रिया थांबली?

Pune Graduate and Teacher voter registration faces technical issues as the online portal shows ‘Registration Closed’ : शनिवारी OTP आणि Loginच्या तांत्रिक अडचणींच्या तक्रारी; रविवारी पोर्टलवर ‘Registration Closed’चा संदेश, इच्छुक मतदारांकडून मुदत आणि नोंदणी प्रक्रियेबाबत स्पष्टतेची मागणी

सरकारनामा ब्युरो

Pune Graduate Constituency voter registration : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणीची अंतिम मुदत रविवार, आज 27 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत देण्यात आली होती.

मात्र, त्याआधीच ऑनलाइन नोंदणीचे पोर्टल बंद झाल्याने अनेक इच्छुक मतदारांना नोंदणी करता आली नसल्याची तक्रार समोर आली आहे. त्यातच शनिवारी दिवसभर संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने नवमतदारांची मोठी गैरसोय झाली.

शनिवारी नोंदणी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक मतदारांना लॉगिन आणि OTP Verification करताना अडथळ्यांचा सामना करावा लागला. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर लॉगिन न होणे, मोबाईलवर आलेला OTP स्वीकारला न जाणे तसेच वारंवार ‘Try after sometime’ असा संदेश दिसणे, अशा तक्रारी मतदारांकडून करण्यात आल्या. भारत निवडणूक आयोगाने (Election Commission) पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ऑनलाइन नवीन मतदार नोंदणीची मुदत 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत निश्चित केली होती. त्यामुळे शनिवारी तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न झालेल्या मतदारांनी रविवारी सकाळी पुन्हा प्रयत्न केला.

मात्र, रविवारी सकाळी पोर्टलवर ‘Registration Closed’ असा संदेश दिसत होता. त्याखाली ‘Registration Close on 27 September 12 PM’ अशी सूचना होती. त्यामुळे अंतिम मुदत दुपारी 12 वाजेपर्यंत असताना त्यापूर्वीच नोंदणी बंद का करण्यात आली, असा प्रश्न इच्छुक मतदारांकडून (Voter) उपस्थित केला जात आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी इच्छुकांना ऑनलाइन पोर्टलवर मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करावे लागत होते. मोबाईलवर आलेल्या OTPचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर आवश्यक माहिती भरावी लागत होती.

OTP व्हेरिफिकेशनला अडथळा

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार फोटो, स्वाक्षरीचा नमुना, शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, रहिवासी पुरावा यांसह आवश्यक कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करावी लागत होती. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदणी पूर्ण होत होती. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना लॉगिनपासूनच अडथळे आले. काही मतदारांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करूनही OTP व्हेरिफिकेशन पूर्ण झाले नसल्याचे सांगितले.

मतदारांमध्ये संभ्रम

जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार पुणे विभागात 3 लाख 7 हजार 823 पदवीधर मतदार आणि 51 हजार 750 शिक्षक मतदार होते. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या मतदारांची नोंदणी महत्त्वाची मानली जात आहे. अशा परिस्थितीत अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशीच पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होणे आणि अंतिम मुदत संपण्यापूर्वीच नोंदणी बंद झाल्याचे दिसणे, यामुळे इच्छुक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मतदारांची मागणी काय?

ऑनलाइन नोंदणीसाठी मुदत दुपारी 12 वाजेपर्यंत असताना पोर्टल आधीच बंद झाले असेल, तर तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी न करू शकलेल्या मतदारांना संधी मिळणार का, याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः शनिवारी पोर्टल व्यवस्थित कार्यरत नसल्याने ज्या मतदारांना वेळेत अर्ज करता आला नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ किंवा पर्यायी नोंदणीची व्यवस्था केली जाणार का? याकडे आता इच्छुक मतदारांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT