Pune prostitution Racket Sarkarama
पुणे

Pune Prostitution Racket : धक्कादायक! पुण्यातील उच्चभ्रू भागात आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; 10 परदेशी तरुणींची सुटका

Pune police bust international prostitution racket : पुणे शहरातील उच्चभ्रू परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परिमंडळ 4 अंतर्गत बाणेर आणि विमानतळ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी 18 तरुणींना ताब्यात घेत त्यांची सुटका केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 09 Jul : पुणे शहरातील उच्चभ्रू परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परिमंडळ 4 अंतर्गत बाणेर आणि विमानतळ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी 18 तरुणींना ताब्यात घेत त्यांची सुटका केली आहे.

यामध्ये 10 हून अधिक परदेशी महिलांचा समावेश आहे. या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील देह व्यापाराच्या साखळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळ परिसरातील एका स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकत 16 महिलांची सुटका केली. यामध्ये 10 परदेशी आणि 6 भारतीय तरुणींचा समावेश आहे.

संबंधित स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागा भाड्याने देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे स्पा बेकायदेशीर पद्धतीने वेश्या व्यवसायासाठी वापरले जायचे अशी माहिती आता समोर आली आहे.

बाणेरमध्येही स्पा सेंटरवर छापा

दरम्यान, पोलिसांच्या दुसऱ्या कारवाईत, बाणेरमधील एका प्रिमियम स्पा सेंटरवर धाड टाकण्यात आली. या ठिकाणाहून दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, येथेही 'मसाज'च्या नावाखाली ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम आकारून देह व्यापार केला जात असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी आता स्पा मालक व व्यवस्थापक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विमानतळ व बाणेर पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येत असून आर्थिक व्यवहार, परदेशी महिलांचे भारतात येण्याचे मार्ग आणि संपूर्ण रॅकेटमागील सूत्रधारांची सखोल चौकशी सुरू आहे. पोलिसांनी या प्रकारच्या बेकायदेशीर स्पा सेंटरवर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT