Rupali chakankar, pankaj khevalkar  Sarkarnama
पुणे

Pranjal Khewalkar Case : चाकणकरांनी आरोप केलेले खडसेंच्या जावयाचे व्हिडिओ कट-कॉपी-पेस्ट? ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खेवलकर प्रकरणात नवा ट्विस्ट

Sushma Andhare vs Rupali Chakankar : पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

Sudesh Mitkar

Pune News, 09 Aug : पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत.

खेवलकर यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणात अश्लील व्हिडिओ क्लिप्स आणि फोटो असल्याचा दावा महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत केला होता. मात्र आता हे व्हिडिओ कट कॉपी पेस्ट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

अंडरवर्ल्डच्या गँगवॉरमध्ये देखील नैतिकता पाळली जाते. काही झाले तरी कुटुंबियांना हात लावायचा नाही. मात्र, खडसे महाजन यांच्या शीत युद्धामध्ये मात्र नैतिकतेचे सगळे निकष मोडीत काढण्यात आले आहेत. या दोघांच्या शीतयुद्धामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर मात्र आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करू पाहत आहेत. हे अत्यंत केविलवाणं आहे.

मुळात खेवलकर यांच प्रकरण नार्कोटिक्स विभागाकडे आहे आणि या केस संदर्भातील कोणतेही पुरावे जाहीर करण्याचा अधिकार त्यांनाच असताना चाकणकरांचा तोंड चोमडेपणा येतो कुठून? तो अधिकार त्यांना दिला कोणी? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

हा विषय महिलांशी निगडित असल्याने चाकणकर बोलत असाव्यात असं गृहीत धरलं तरी या प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणत्याही पिडीतेने चाकणकर यांच्याकडे तक्रार केलेली नाही. मोबाईलमध्ये व्हिडिओ असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे. मात्र गेल्या सात दिवसांपासून खेवलकरांचा फोन तुमच्या ताब्यात असल्याने ते व्हिडिओ कट पेस्ट एडिट झालेत का?

त्या व्हिडिओसोबत काही छेडछाड झाली आहे का? हे आत्ताच सांगणे अवघड असल्याचंही अंधारे म्हणाले. तर खेवलकर यांचे व्हिडिओ खरे असल्याचे गृहीत धरलं तरी अशाच प्रकारचे किरीट सोमय्या यांचे व्हिडिओ माध्यमांमध्ये देखील आले तेव्हा रूपाली चाकणकर ह्या कोणत्या बिळात बसल्या होत्या. त्यावेळी चाकणकरांना महाराष्ट्राची बदनामी, घृणास्पद प्रकार यासारखे सो कॉल्ड शब्द सुचले नाहीत का?

चाकणकर यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नाही ते करण्यासाठी नैतिकतेचे बळ लागतं आणि स्वतःची कुवत लागते. यापैकी कोणतीही पात्रता चाकणकर यांची नाही. त्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लाडावून ठेवलेलं पात्र आहेत. जे पात्र जमेल तसं सिलेक्टिव्ह पद्धतीने व्यक्त होत राहतं, अशा शब्दात अंधारे यांनी चाकणकरांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, कोथरूडमधील मुलींच्या संदर्भातील पोलिसांची वागणूक, वैष्णवी हगवणे प्रकरण, रिंकी बक्सा आणि निर्मला यादव यासारख्या महाराष्ट्रातील अनेक महिला आत्याचारा संदर्भातील प्रकरणांमध्ये रूपाली चाकणकर यांना बोलण्यास वेळ नव्हता. त्यांना फक्त पॉलिटिकल स्कोर करण्यासाठी वेळ आहे, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT