jitendra awhad, vaishanavi patil sarkarnama
पुणे

शिवाजी महाराजांचा लाल महल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नव्हे !

वैष्णवी पाटील ही चंद्रमुखी सिनेमातील गाण्यावर थिरकताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुण्यातील (pune) ऐतिहासिक लाल महालात (lal mahal) लावणीचा व्हिडीओ शूट केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर समाजमाध्यमांवर नेटकरी उलट-सुलट प्रतिक्रिया देत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी देखील या व्हिडिओवर आक्षेप नोंदवला आहे. चार दिवसांपूर्वी वैष्णवी पाटील (vaishanavi patil)आणि तिच्या तीन साथीदारांनी लाल महालात नृत्य करत शूटिंग करुन व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केले होते. वैष्णवीच्या नृत्यानंतर समाज माध्यमातून टीका होत आहे.

वैष्णवी पाटील ही चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा (chandra) गाण्यावर थिरकताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा प्रकार सोमवारी (ता. 16) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लाल महाल येथे घडला.

जितेंद्र आव्हाड यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. नागरिकांना असे प्रकार पुन्हा करू नये असा आवाहन केले आहे. "पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे असे होता कामा नये, कोणी केले असेल तर चित्रीकरण वापरू नका," असे टि्वट आव्हाडांनी केलं आहे. लाल महालात नृत्याविष्कार केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा करण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडनेही या व्हिडीओवर आक्षेत घेत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्रार दाखल केली आहे. लाल महालात तमाशातल्या गाण्यांवर मुलींना (Vaishnavi Patil dance in Lal Mahal ) नाचवून बदनाम केला जात आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.मराठा महासंघाकडून लाल महालाचं शुद्धीकरण करण्यात आले आहे.

याप्रकरणी राकेश विनोद सोनवणे (वय 37, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लाल महालामध्ये रखवालदार म्हणून काम पाहतात. या प्रकारामुळे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांना मानणाऱ्या समाजाच्या भावना दुखावल्या. या प्रकारामुळे लाल महाल या पवित्र वास्तुचे पावित्र्य भंग केले, फिर्यादी यांनी त्यांना लावणी नृत्य व त्याचे चित्रीकरण करण्यापासून रोखले असतानाही त्यांनी फिर्यादीचे ऐकले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT