Jagdish Mulik, Muralidhar Mohol Sarkarnama
पुणे

Pune News: मोहोळांवर मुळीक नाराज? स्वत:च्या मतदारसंघातील बैठकीकडे फिरवली पाठ...

BJP Politics Pune Lok Sabha Constituency 2024:पुणे लोकसभेच्या उमेदवारीवरून मोहोळ-मुळीक यांच्यात चढाओढ सुरू होती. त्यांचे अनेक वेळा भावी खासदारांचे बॅनरदेखील झळकल्याचे पुणेकरांनी पाहिले आहेत.

Mangesh Mahale

Pune News: भाजपच्या दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या यादीत पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency 2024) मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol)यांचं नाव जाहीर झाले. उमेदवारी जाहीर होताच मोहाळांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे पक्षावर नाराज असल्याचे चित्र आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सहयोगी पक्षांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका होत आहेत. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. बैठकीतून पक्षांतर्गत हेवे-दावे आणि रुसवे-फुगवे मिटवण्यावर भर देण्यात येत आहे. पुण्यात आज महायुतीची बैठक झाली. बैठकीला भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक अनुपस्थित होते. यामुळे मुळीक हे पक्षावर नाराज आहेत का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोहोळांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुळीकांनी "मी सदैव जनतेसाठी" अशी फेसबुक पोस्टसुद्धा केली होती. विशेष म्हणजे महायुतीची आज विधानसभानिहाय बैठक मुळीक यांच्या वडगाव शेरी मतदारसंघातच झाली. बैठकीला जगदीश मुळीक उपस्थितीत नसल्यामुळे ते पक्षावर नाराज आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

पुणे लोकसभेच्या उमेदवारीवरून मोहोळ-मुळीक चढाओढ सुरू होती. मोहोळ अन् मुळीक यांच्या समर्थकांकडून अनेक वेळा भावी खासदारांचे बॅनरदेखील झळकल्याचे पुणेकरांनी पाहिले होते. उमेदवारी मिळण्यासाठी मुळीक यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुरलीधर मोहोळ यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता जगदीश मुळीक त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारण्यात येत आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT