RJ Sangram Sarkarnama
पुणे

Pune News : आरजे असलेल्या अन् माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला व्हायचंय पुण्याचा खासदार

Pune Lok Sabha Constituency 2024 RJ Sangram : मी राहुल गांधी यांचीदेखील भेट घेतली...

Sudesh Mitkar

Pune News : पुणे लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज पुणे काँग्रेसने मागवले होते. अर्ज करण्यासाठी मंगळवारपर्यंतची मुदत काँग्रेसकडून देण्यात आली होती. या कालावधीत एकूण 20 जणांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे आता सर्वांनाच वेध लागले आहेत, तर राजकीय पक्षांनीदेखील कंबर कसली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने काँग्रेसकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. नुकतेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुणे दौरा झाल्यानंतर काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते.

या अर्जांमध्ये सध्याचे पुणे शहरातील आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी आमदार आजी-माजी शहराध्यक्ष, काँग्रेसचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी यांनीदेखील पुण्यातून काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र या सर्व नावांमध्ये प्रकर्षाने एक नाव वेगळं असल्याचं दिसून येत आहे ते नाव म्हणजे पुण्यातील विविध रेडिओ चॅनलच्या माध्यमातून तुमच्या आमच्या भेटीला येणारे आरजे संग्राम खोपडे यांनीदेखील लोकसभा लढवण्यासाठी काँग्रेसकडून इच्छा व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

'सरकारनामा"शी बोलताना संग्राम खोपडे म्हणाले, "काँग्रेस आणि माझं नातं जुनं आहे. कॉलेजजीवनापासूनच मी काँग्रेसच्या संलग्न असलेल्या संघटनांसोबत काम केले आहे. आणि आजही मी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे. यासाठी मी अनेकदा राहुल गांधी यांचीदेखील भेट घेतली आहे. त्यांनी मला राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे."

"राजकीयदृष्ट्या पुण्याच्या राजकारणात मी यापूर्वी जास्त सहभाग घेतला नाही, मात्र गेल्या दोन वर्षांपासून पुणे शहरातील असलेल्या विविध समस्यांवर मी अभ्यास केला आहे. त्यामुळे बदलत्या पुण्याला एक व्हीजनची गरज आहे. जी सध्याच्या राजकारण्यांमध्ये दिसत नाही. त्यामुळे विकास एका वेगळ्या अंगाने होताना पाहायला मिळत आहे. या विकासामध्ये नियोजनाचा अभाव प्रकर्षाने दिसून येतो. त्यामुळे या सुसंस्कृत पुण्याला व्हीजन असलेल्या नेत्याची गरज आहे. त्यामुळे फक्त पुण्याच्या निवडणुकीत स्वतः उतरून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न मी पाहिले आहे. सध्या काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्याचे मला पाठबळ नसले तरी माझे वडील माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडूनच समाजकारणाची देणगी मला मिळाली आहे. त्यातूनच मी राजकारणामध्ये समाजकारण करण्यासाठी येणार आहे," असे खोपडे म्हणाले.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT