Pune News : पुणे लोकसभेसाठी (Pune Loksabha Election) आज मतदान होत असून पुण्यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद मतदारांकडून मिळताना पाहायला मिळत आहे. एकीकडे मतदारांचा उत्साह असताना दुसरीकडे मात्र या निवडणुकीमध्ये पैसे वाटपाच्या आरोप आणि आंदोलनामुळे गालगोट लागताना दिसत आहे. अशातच एक धक्कादायक बाप समोर आली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांच्या नावावरती बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबतचा आरोप खुद्द अरविंद शिंदे यांनीच केला आहे.
पुण्यामध्ये प्रमुख लढत ही महाविकास आघाडीची (MVA) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यात होत आहे. यामुळे काँग्रेस आणि भाजप एक प्रकारे आमने-सामने असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवरती पैसे वाटपाचे आरोप करत आहेत. आज सकाळी 11 वाजता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे सेंट मेरीज स्कूलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिंदे यांच्या नावावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मतदान करून गेल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर शिंदे यांना टेंडर व्होट अंतर्गत मतदान करण्याची संधी देण्यात आली. (Pune Loksabha Election 2024 update)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबत अरविंद शिंदे म्हणाले, "मी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान सेंट मेरीज स्कूलमध्ये मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गेलो असता रजिस्टरमध्ये माझ्या नावावरती मतदान केले असल्याची नोंद पाहून मला धक्का बसला. याबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केली. त्यानंतर टेंडर व्होट सुविधे अंतर्गत मला मतदान करण्याची संधी देण्यात आली. मात्र या मताची गणना केली जाईल की नाही याबाबत शंका आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर प्रकार आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे शिंदे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. (Bogus voting in the name of Congress city president, using fake voter ID)
पुणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडी कडून माझी नगरसेवक वसंत मोरे, तर एमआयएम पक्षाचे अनिल सुडके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गेल्या दीड महिन्यापासून या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बोगस मतदान केल्याचे काही प्रकार समोर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.