Pune News: राज्यातील बहुतांश महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. महायुतीतील घटक पक्षातील मित्र आणि महाविकास आघाडीतील शत्रूशी दोन हात करीत भाजपने पुन्हा एकदा आपण नंबर एकचा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. महापालिकेतील यशानंतर आगामी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत भाजप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
आगामी पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भारतीय जनता पार्टीची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीला पुणे उत्तर आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्षांसह प्रमुख नेते,पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढायला हवी, असा सूर या बैठकीत उमटला आहे.
महापालिका निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात कलगीतुरा रंगला होता. पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांना पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने धूळ चारली आहे. पुणे जिल्हा परिषदेतही अजित पवार यांचे वर्चस्व आहे. महापालिका निवडणुकीत अजित पवार यांनी महापालिकेतील भष्ट्राचाराबाबतच भाजप नेत्यांवर टीका केली होती.
आता जिल्हा परिषदेत निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात भाजप आरोपांची राळ उठवणार, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता पुण्यात जिल्हा परिषदेची निवडणूक अधिक रंगणार असे दिसते. महापालिकेचा प्रचारात अजितदादांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडले होते. त्याचा वचपा जिल्हा परिषदेच्या निवडणूक भाजप काढणार, असे दिसते.
महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जादू चालली असल्याचे दिसते. 29 महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आतापर्यंत भाजपने 13 ठिकाणी एकहाती सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. इचलकरंजीपासून नागपूरपर्यंत आणि नाशिकपासून नवी मुंबईपर्यंत कमळ फुलले आहे.
पनवेल, उल्ल्हासनगर, इचलकरंजी, पुणे, धुळे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई,मीरा-भाईंदर, नाशिक, नागपूर, नांदेड, सांगली आणि जालना या तब्बल 13 महानगरपालिकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.