Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama
पुणे

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (Vikramkumar) चार दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यापाठोपाठ आता महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. महापौर मोहोळ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.त्या दिवशी दुपारनंतर त्रास होत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी करण्यात आली.त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.पदाधिकाऱ्यांच्या आजारपणामुळे मुख्यसभेचे कामकाज ठप्प झाले आहे.

पुणे महापालिकची निवडणूक कधी होणार हे अद्याप निश्‍चित झाले नसले तरी सर्वांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे ही या महिन्यात होणारी मुख्यसभा शेवटची असू शकते. त्यामुळे अनेक नगरसेवकांना वर्गीकरणासह त्यांचे महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करून घ्यायचे असल्याने गडबड सुरू आहे. राज्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने राज्य सरकारने महापालिकेच्या मुख्यसभेसह सर्वच बैठकांवर निर्बंध आणत हे कामकाज ऑॅनलाईन घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने ऑॅनलाईन मुख्यसभा घेण्याचे नियोजन केले आहे, तरीही आजारपणामुळे कामकाज होऊ शकलेले नाही.

" महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील सात ते आठ जण आजारी आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे देखील तब्येत बरी नसल्याने आजच्या मुख्यसभेला उपस्थित राहू शकले नाहीत," अशी माहिती सभागृह नेते दीपक बीडकर यांनी दिली.दरम्यान, गेल्या आठवड्यात सभागृहनेते बीडकर स्वत: आजारी असल्याने मुख्यसभा एक आठवडा तहकूब करावी लागली होती, त्यानंतर आता सलग दुसऱ्या आठवड्यातही हीच परिस्थिती ओढावली आहे.

केवळ पदाधिकारी नव्हे तर महापालिकेतील विविध विभागातील अनेक आधिकारी व कर्मचारी मोठ्याप्रमाणात आजारी आहेत. कोरोनाशिवाय सदी, खोकला यासारख्या विषाणूजन्य आजाराने अनेकजण आजारी पडले आहेत.या साऱ्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर झाला असून वातावरणातील बदलामुळे आजारपणात वाढ होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT