Pune Metro sarkarnama
पुणे

पुणे मेट्रो कॉंग्रेसची देणगी ; भाजप-कॉग्रेस यांच्यात श्रेयाची लढाई सुरु

पुण्यात मेट्रो रेल्वे आणण्याचे मोठे श्रेय काँग्रेस पक्षाचे आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे

सरकारनामा ब्युरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (रविवारी) पुण्यात मेट्रोचे (Pune Metro) उद्धघाटन होत आहे. पुण्यात मेट्रो कुणामुळे आली, यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. भाजप आणि कॉग्रेस यांच्यात श्रेयावरुन लढाई सुरु आहे.

''पुण्यात मेट्रो रेल्वे आणण्याचे मोठे श्रेय काँग्रेस पक्षाचे आहे, हे भाजपच्या नेत्यांनी लक्षात ठेवावे आणि मेट्रोचा पाठपुरावा करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मेट्रोच्या उद्धघाटन सोहळ्याचे निमंत्रण का नाही ? असा काँग्रेसचा सवाल असून भाजपने कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi)यांनी केली आहे.

मोहन जोशी म्हणाले, ''शहरातील विविध योजनांचा गाजावाजा भाजपने सुरु केलेला आहे. पण, या योजनांचा पाया काँग्रेसने घातला हे पुणेकर जाणून आहेत. २००१ मध्ये स्थायी समितीत मेट्रोची मंजुरी झाली तेव्हा काँग्रेसच्या संगीता देवकर स्थायी समितीच्या अध्यक्ष होत्या. खासदार सुरेश कलमाडी यांच्या सूचनेवरून हा प्रस्ताव आला होता. त्यानंतर १५ ऑगस्ट २००८ मध्ये दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पुणे मेट्रोसाठी प्रारुप आराखडा बनविण्याचे काम हाती घेतले. जून २०१२मध्ये राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पाला मंजुरी दिली आणि त्याच महिन्यात काँग्रेस आघाडी सरकारने प्रकल्प आराखडा केंद्र सरकारला सादर केला. २०१३मध्ये तत्कालीन केंद्रीय नगरविकासमंत्री कमलनाथ, कृषीमंत्री शरद पवार यांच्यासमवेत खासदार सुरेश कलमाडी यांनी प्रदीर्घ बैठक घेतली आणि केंद्राकडे पुणे मेट्रो मंजुरीची मागणी केली,''

''भाजपचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विरोधामुळे मेट्रोला उशिर झाला आणि २०१४ ऐवजी २०१६ मध्ये केंद्राची मंजुरी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मग, पृथ्वीराज चव्हाण यांना निमंत्रण का देण्यात आलेले नाही ? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे. आमदार म्हणून मी सुद्धा विधीमंडळात पुण्याच्या मेट्रोच्या मागणीचा मुद्दा वारंवार मांडलेला आहे. भाजपने काही नेत्यांना हायजॅक केलेच आता कामाचे श्रेयही हायजॅक करू पहात आहेत,अशी टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT