Pune News: मनसे नेते वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी "साईनाथ बाबर दिल्लीत गेले, तर दुधात साखर पडेल," असं वक्तव्य केल्यामुळे मोरेंचा पत्ता कट झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यातच वसंत मोरेंनी व्हॉट्सअॅपवर "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच. पण, मी पट्टीचा गारुडी आहे. योग्यवेळी सगळी गाणी वाजणार," असे स्टेटस ठेवले. (Vasant More WhatsApp Status and Facebook post Viral)
वसंत मोरेंनी ठेवलेल्या स्टेटसची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. तसेच मोरेंनी या स्टेटसच्या माध्यमातून नेमकं कोणाला सूचक इशारा दिला ? त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे ? याबाबत तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली. मात्र, यानंतर वसंत मोरेंनी पुन्हा फेसबुक पोस्ट टाकत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"वसंत मोरे अजून इतका मोठा झाला नाही की, आमचा मानबिंदू राजसाहेब ठाकरे यांना आणि मनसेला इशारा देईल, आम्ही कायम राजसाहेबांचे हनुमान...", असं वसंत मोरेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, मोरेंनी आपण कायम राज ठाकरे यांच्यासोबत असल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांनी ठेवलेल्या "कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच. पण, मी पट्टीचा गारुडी आहे. योग्यवेळी सगळी गाणी वाजणार, या स्टेटसचा अर्थ नेमकं काय ? त्यांनी या स्टेटसच्या माध्यमातून नेमकं कुणाला इशारा दिला ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
वसंत मोरेंनी लोकसभा मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सध्या 'जनता दरबार' सुरू केलेला आहे. तसेच शहरभर 'पुण्याची पसंत मोरे वसंत' अशी बॅनरबाजी करण्यात आली होती. एकीकडं मोरेंची तयारी सुरू असतानाच दुसरीकडे शर्मिला ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मोरेंचा पत्ता कट झाला का ? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच मोरेंच्या स्टेटसने भर घातली. त्यामुळे ते याबाबत अजून सविस्तर काही बोलतात का ? ते पाहणेदेखील महत्त्वाचे असणार आहे.
(Edited By-Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.