Pune Mayor Manjusha Nagpure announces names of 78 corporators appointed to six key PMC subject committees during the General Body Meeting at Pune Municipal Corporation. Sarkarnama
पुणे

PMC Finance Committee : कोरोना काळातील एका समितीची कमाल; पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी-विरोधकांची युती

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वित्त समिती बरखास्त करण्याची मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी केली. विकास कामे रखडत असल्याचा आरोप करण्यात आला, तर आयुक्तांनी समिती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Pune Municipal Corporation News : पुणे महापालिकेतील आर्थिक व्यवहारांना आर्थिक शिस्त लावणारी वित्त समिती बरखास्त करून टाका अशी मागणी सत्ताधारी आणि विरोधकांनी करत त्यांच्या युतीचे दर्शन पहिल्याच सर्वसाधारण सभेत दाखवून दिले. या समितीमुळे विकास कामे रखडत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. त्यावर आयुक्त नवल किशोर राम यांनी वित्तीय समिती आवश्यक आहे. जर विकास कामे रखडत असतील तर त्यात सुधारणा केली जाईल, असा खुलासा केला.

पुणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज (ता. 18) पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या नगरसेवकांची ही पहिलीच सभा असताना त्यात नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी वित्त समितीच्य कामकाजावर प्रश्न उपस्थित केला. प्रशासक काळात प्रशासनाला कामे करायची होती की अडवायची होती. ही अशी कोणती वित्त समिती आहे त्याची माहिती द्या अशी मागणी केली.

त्यास धीरज घाटे यांनी पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या काळात वित्त समिती अस्तित्वात आली. तेव्हा त्याची गरज होती. पण आता या समितीची गरज नसल्याने ती बरखास्त करा.’’ ‘‘आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकारी स्थायी समिती, सर्वसाधारण सभेला आहे. त्यामुळे वित्त समिती रद्द करा,’’ अशी मागणी बाबूराव चांदेरे यांनी देखील केली. अरविंद शिंदे यांनीही वित्त समितीच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. नगरसेवकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर खुलासा केला.

(PMC) आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘‘वित्त समितीमध्ये अनेक प्रस्ताव येतात. त्यात काम करायचे की नाही याचा निर्णय घेता येतो. स्थायी समितीसाठी अनेक प्रस्ताव त्याबाबत सखोल माहिती घेता येत नाही. वित्त समिती आवश्यक आहे. पण वित्त समितीमुळे कामे जर विकास कामांना उशीर होत असेल तर ते तपासून घेऊन सुधारणा केल्या जातील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT