Police officials investigating the murder of West Bengal migrant worker Sukhen Mahato in Koregaon Bhima, Pune district, amid political controversy. Sarkarnama
पुणे

Pune Police : पुण्यात बंगाली तरुणाची हत्या; कोलकातावरून थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे गंभीर आरोप : पण, पोलिसांनी सांगितलं वेगळंच सत्य

Mamata Banerjee Statement Pune News : पुण्यातील कोरेगाव भीमा येथे बंगालच्या सुकेन महातो यांची हत्या झाली. ममता बॅनर्जी यांनी हेट क्राइमचा आरोप केला, मात्र पुणे पोलिसांनी सांप्रदायिक अँगल नाकारून तपास सुरू असल्याचे सांगितले.

Sudesh Mitkar

Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा (शिरूर तालुका) येथे पश्चिम बंगालच्या एका 24 वर्षीय स्थलांतरित कामगाराची धारदार शस्त्राने क्रूर हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरूणाचे नाव सुकेन महातो असून, तो पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील बांदवान गावातील रहिवासी होता.

पुण्यात झालेल्या या हत्येची दखल थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. या हत्या प्रकरणांमध्ये ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर पुणे पोलीस देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असून पुणे पोलिसांनी हे सर्व आरोप खोडून काढले आहेत.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, सुकेन महातो या 24 वर्षीय स्थलांतरित कामगाराच्या क्रूर हत्येने मी हादरले आहे आणि माझा संताप झाला आहे. ज्याची हत्या झाली तो पुरुलियातील बांदवान येथील रहिवासी होता, त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता, त्याची हत्या महाराष्ट्रातील पुण्यात (Pune) झाली आहे.

ही हत्या पूर्णपणे हेट क्राइम आहे. एका तरुणला त्याच्या भाषेसाठी, त्याच्या ओळखीसाठी छळ करून मारलं गेलं. हे असे वातावरण आहे जिथे परप्रांतीय द्वेष शस्त्रासारखे वापरले जाते आणि निर्दोष लोकांना लक्ष्य बनवले जात आहे. असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

पुणे पोलिसांची प्रतिक्रिया :

याबाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीपसिंग गिल म्हणाले, भीमा कोरेगाव येथे 10 फेब्रुवारीला एक बॉडी सापडली होती. त्याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन गुन्हा दाखल आहे. सुकेन महातो असे मयताचे नाव आहे, तो मुळाचा बंगलाचा आहे. तो भीमा कोरेगाव येथे राहत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या दोन व्यक्तींची आणि त्याची बाचाबाची झाली आणि त्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज असल्याचं पोलिस अधीक्षक गिल यांनी सांगितलं.

तसेच या दोन संशयितांना ताब्यात घेण्यास आमची टीम गेली आहे. मृत व्यक्तीच्या आधीच्या हालचालीवरून प्राथमिक दर्शनी तो दारू पिला होता असे दिसत आहे. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर बाकी गोष्टी माहिती स्पष्ट होतील. जसे पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले आहे, प्रथमदर्शनी असं काही वाटत नाही. याबाबत आम्ही आता तपास करत आहोत. कुठल्याही जातीला टार्गेट ठेवून मारलं असं यात दिसत नाही असं गिल म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT