Narendra Modi & Ajit Pawar Sarkarnama
पुणे

अजित पवार मोदींसोबत व्यासपीठावर तरी राष्ट्रवादी आंदोलन करणार

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे पुण्यात स्वागत आहे. मात्र, पुणे भाजपकडून त्यांना गोंधळात टाकण्याचे काम करण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सोमवारी (ता.6 मार्च) पुणे दौऱ्यावर (Pune Visit) येणार आहेत. मोदी यांच्या या दौऱ्यात मेट्रोच्या दोन टप्प्यांसह अन्य प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत. मात्र, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी न लावता पंतप्रधान पुण्यात अर्धवट झालेल्या विकास कामांच्या उदघटनाला येत असल्याची टीका राष्ट्रवादीने (NCP) केली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात शहर राष्ट्रवादी मुक आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली. यामध्ये विशेष बाब म्हणजे मोदींसोबत मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत.

जगताप म्हणाले, पंतप्रधान म्हणून त्यांचे पुण्यात स्वागत आहे. मात्र, पुणे भाजपकडून त्यांना गोंधळात टाकण्याचे काम करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे 31 किलोमीटर मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी नाही तर अर्धवट असलेल्या 5 किलोमीटर मार्गाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येत आहे. हा मार्ग भाजप अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात येते. त्याही पाच किलोमीटर मार्गाचे काम हे अर्धवटच असून याबातचे व्हीडीओ आम्ही प्रसिद्ध करणार आहेत. पंतप्रधानाच्या हस्ते पुणे पालिकेच्या प्रचाराचे नारळ फोडले जात आहे. मात्र, ही पुणेकरांची फसवणूक असल्याने आम्ही मुक आंदोलनाने त्यांचे स्वागत करणार आहे, अशी टीका जगताप यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांना गेल्या दिड महिन्यापासून देशातील पाच राज्यातील निवडणूक प्रचाराला वेऴ मिळाला मात्र, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. यामुळे दोन विद्यार्थांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही मुक आंदोलन करणार आहोत. आमच्या पक्षाची संस्कृती म्हणून आम्ही पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार नाही. मात्र, मुक आंदोलनातून त्यांना संदेश देणार आहे. पोलिस प्रशासनाचा भाग असल्याने अद्याप स्थळ आणि वेळ ठरली नाही. मात्र आंदोलन नक्की होणार आहे. याबाबत आम्ही उद्या निर्णय घेणार असल्याचे जगतापांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मोदींच्या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ हे शासनाचे तसेच महापालिकेचे शेअर होल्डर म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत तरी देखील मोदी यांचा विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे या आंदोलनाचे पडसाद मोदींच्या दौऱ्यावर काय उमटतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT