Pune News :
Pune News :  Sarkarnama
पुणे

Pune News : चांदणी चौकातली वाहतूक कोंडी फुटणार? ; गडकरींनी सांगितले बहुमजली उड्डाणपुलाच्या उद्धाटनाचा मुहूर्त!

सरकारनामा ब्यूरो

Pune News : चांदणी चौक येथील वाहतूक कोंडी समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम प्रगथिपथावर आहे. मात्र या उड्डाणपुलाचे उद्धाटन १ मे राजी महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.

सातारा मुंबई महामार्ग, पाषाण, बावधन, कोथरूड, मुळशी व इतरही काही भागातून वाहत येऊन चांदणी चौकात वाहतूक कोंडी होत असते. यामुळे या ठिकाणी बहुमजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१७ च्या ऑगस्ट मध्ये गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. या पुलाचे उद्धाटन २०२१ मध्ये होणे, अपेक्षित होते. मात्र भूसंपादन, तांत्रिक अडचणी, कोरोना लॉकडाऊन यामुळे काम लांबणीवर पडत गेले. यानंतर ३१ जानेवारी २०२३ ची नवीन मुदत घालून देण्यात आली होती. यानंतर जून २०२३ रोजीचा मुदत देण्यात आली.

चांदणी चौकातील पाषाण एनडीए रस्त्याच्या दरम्यान महामार्गावर नवा मोठ्या पुलासह एकूण आठ विविध मार्ग केले जात आहेत. त्यापैकी पाच मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. अजून एक महामार्गावरील पूल, एक बावधनकडून साताऱ्याकडे जाणारा उड्डाणपूल आणि साताऱ्याकडून मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम अपूर्ण आहे. पाषाण एनडीए रस्ता यांना जोडणारा हा पूल २ आॅक्टोबरला मध्यरात्री स्फोट करून पाडण्यात आला. त्यानंतर हा कठीण खडक फोडण्यासाठी अनेक वेळा स्फोट करण्यात आले. हे काम झाल्यानंतर नव्या पुलाचे पाया व आता पिलर उभारणीचे काम सुरू झालेले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पालखी मार्गाची हवाई पाहणी केल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, ‘‘चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचे काम पुण्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. एक मे रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन करून. पुण्याचा रिंगरोड आम्ही करण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्यातील काही भाग राज्य सरकार करणार आहे, तर काही भाग आम्ही करत आहोत. हा रिंगरोड झाल्यानंतर पुण्यातील वाहतुकीचा भार काही प्रमाणात कमी होईल.

नवले पुलासाठी नवीन डीपीआर :

सातारा- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर नवले पूल येथे वारंवार अपघात होत आहेत त्याबद्दल विचारले असता, गडकरी म्हणाले, ‘‘स्पीड कॅमेरे लावले आहेत. या ठिकाणी जेवढे करता येईल तेवढ्या उपाय योजना केल्या आहेत. आता या पूर्ण महामार्गाचाच नवीन डीपीआर तयार करण्यास सांगितले आहे. पण त्याला मोठा खर्च आहे.’’

मी घोषणा करणाऱ्यातील नाही :

मी फक्त घोषणा करणाऱ्यातील नाही. पुणे महापालिकेला स्काय बससाठी सर्वेक्षण, डीपीआर तयार करू माझ्याकडे प्रस्ताव पाठवा असे सांगितले आहे, पण तो अद्याप आलेला नाही. देशभरात एकूण २६० रोप वे, केबल कारचे काम केले आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT