Raj Thackeray Sarkarnama
पुणे

MNS News : दोन भावांची परीक्षा फी भरणं मनसे उमेदवाराच्या आलं अंगलट ; निवडणूक आयोगाची नोटीस

MNS Candidate Ganesh Bhokare Notice by Election Commission : "निवडणुकीच्या काळात तुम्ही अशा पद्धतीने फी भरू शकत नाहीत," असे नोटीशीमध्ये म्हटले आहे. विद्यार्थ्यांची फी भरून जर मी काही चूक केली असेल तर असे असे अनेक गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार आहे, असे भोकरे यांनी सांगितले.

Mangesh Mahale

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पाच दिवस बाकी आहेत. नेत्यांच्या सभा, रॅलींनी प्रचारात रंगत वाढत आहे. आचारसंहितेमुळे अनेक ठिकाणी बॅगा तपासणी होत आहेत. काही ठिकाणी लाखों रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता पथकाला सापडली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मतदारसंघातील दोन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क गणेश भोकरे यांनी भरल्याने ते अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

पुण्यातील मध्यवस्तीतील एका शाळेमध्ये दोन भाऊ शिकतात. एक आठवीला आणि तर दुसरा नववीला आहे. शाळेने त्यांना 75 हजार रुपये फी भरा असं सांगितलं होतं. मात्र घरची परिस्थिती नसल्याने ते फी भरण्यास असमर्थ होते. त्यामुळे गणेश भोकरे यांनी शाळेत जाऊन दोन्ही मुलांचे शुल्क 20 हजार रुपये भरले. याबाबतची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यांची दखल आयोगाने घेत भोकरे यांना नोटीस बजावली आहे.

"निवडणुकीच्या काळात तुम्ही अशा पद्धतीने फी भरू शकत नाहीत," असे भोकरे यांना पाठवलेल्या नोटीशीमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने म्हटले आहे. विद्यार्थ्यांची फी भरून जर मी काही चूक केली असेल तर असे असे अनेक गुन्हे मी अंगावर घ्यायला तयार आहे, असे भोकरे यांनी सांगितले. "जी लोक काम करीत नाहीत त्यांच्यावर कुठले गुन्हे नसतात, मी काम करतो तर माझ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत," असे भोकरे म्हणाले. याबाबतचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

कसब्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी लढत होणार आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत गमाविलेला कसबा मतदारसंघ भाजप पुन्हा काबीज करणार का? याकडे आता लक्ष असणार आहे. धंगेकर-रासने लढतीत मनसेच्या गणेश भोकरे यांनी कसब्यात उडी घेतली आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे 23 तारखेला समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT