Devendra Fadnavis, Sharad Pawar Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : ...म्हणून फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर, शरद पवारांच्या नेत्याने सांगितलं कारण

Maharashtra assembly elections campaign updates: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सबंध महाराष्ट्रभर उडत आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 17 Nov : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सबंध महाराष्ट्रभर उडत आहे. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच पुण्यात प्रचारानिमित्त आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमधून बाहेर का पडलेत यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.

पुण्यात (Pune) माध्यमांशी बोलताना कोल्हे म्हणाले, दीड वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काही लोकांनी जी भूमिका घेतली त्याबाबत एका पुस्तकात मोठ्या प्रमाणात खुलासे करण्यात आले आहेत. या पुस्तकातील खुलासे बाहेर आल्यानंतर महाराष्ट्र चुकीला माफ करू शकतो, मात्र गद्दारीला नाही.

हे काही लोकांना समजून चुकलं असल्याने काही लोक भावनिक आवाहन करत असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता अजित पवारांना लगावला. अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामतीत जाऊन आपण बारामतीचा खूप विकास केला असून दुसऱ्या मतदारसंघांमध्ये असा विकास केला असता तर लोकांनी डोक्यावर घेतलं असतं असं विधान केलं होतं.

यावर कोल्हे म्हणाले, "विकासाच्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतात. काही लोकांना रस्ते बांधले, इमारती बांधल्या की विकास झाला असं वाटतं. मात्र माणसं उभी करणं कुटुंब उभी करणं याला आपण जास्त शाश्वत विकास म्हणतो आणि तीच गोष्ट शरद पवारांनी बारामतीत गेली 55 वर्ष सातत्याने केली आहे."

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पुण्यातील सभेमध्ये केलेल्या व्होट जिहादच्या वक्तव्यावरही कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये नाही असं सांगून अप्रत्यक्षरीत्या कबुली दिली आहे की, राज्यात महायुतीचे सरकार येत नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अठरा पकड जाती एकत्रित घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची परंपरा आहे.

अशा महाराष्ट्रामध्ये व्होट जिहादची भाषा महाराष्ट्राचे नेतृत्व केलेल्या नेत्याला शोभत नाही. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ भोसरीमध्ये प्रचारासाठी येत आहेत. त्यावरही कोल्हे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगार तरुणांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारलं होतं. त्यामुळे योगी यांनी त्यांना रोजगार देण्यासंदर्भात लक्ष देणे आवश्यक आहे.

असं असताना योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्राच्या प्रचारात मग्न होत असतील तर त्यांना सांगण्याची वेळ आलेली आहे की त्यांनी त्यांचं राज्य व्यवस्थित सांभाळावं. इतक्या वर्ष योगी आदित्यनाथ त्या ठिकाणचे मुख्यमंत्री राहून देखील निम्मा उत्तर प्रदेश पोट भरण्यासाठी महाराष्ट्र मध्ये येत असेल तर ते काय करत आहेत. असा प्रश्न निर्माण होत आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT