Raja Bhaiya, Hindu Janaaakrosh Morcha  Sarkarnama
पुणे

Pune News : '' छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस 'धर्मवीर दिन' म्हणून घोषित करा..''

सरकारनामा ब्यूरो

Raja Bhaiya : पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मोर्चा लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या बंदी आणि संभाजी महाराजांच्या बलिदान दिन हा संपूर्ण देशात धर्मवीर दिन म्हणून घोषित करावा यांसारख्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आला होता. या मोर्चात तेलंगणाचे आमदार राजा भैय्या हे देखील सहभागी झाले होते. या मोर्चावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राजा भैय्या म्हणाले, हिंदू जनआक्रोशच्या मोर्चाला आज पुण्यात काढण्यात आला आहे. आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लव्ह जिहादवर बंदी यावी असं या लोकांचं मत आहे. देशातील प्रत्येक हिंदूला आज असं वाटतंय की, धर्मांतर, लव्ह जिहादवर कायदा यायला हवा. भारतातील अनेक तरुण-तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव्ह जिहादच्या नावाखाली फसवलं जात आहे. या नावाखाली आपण बघितलं की, एका मुलीचे ३५ तुकडे करून मारण्यात आलं.

भारताच्या अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत. त्यामुळे येत्या काळात गोहत्या लव्ह जिहाद आणि धर्मांतरविषयी कडक कायदा बनवला गेला नाही तर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात असे मोर्चे निघतील. महाराष्ट्रमध्ये लव्ह जिहादला उखडून फेकायचं आहे. महाराष्ट्र मध्ये नाही तर देशात लव्ह जिहादचे षडयंत्र पसरले जात आहे. याबाबत कायदा जर झाला नाही तर आपल्या माता भगिंना सुरक्षित कशा राहतील असा सवालही तेलंगणाचे आमदार राजा भैय्या (Raja Bhaiya) यांनी उपस्थित केला आहे.

तसेच छत्रपती संभाजी महाराजना ज्यादिवशी मारलं. त्यादिवसाला धर्मवीर दिन म्हणून घोषित करा अशी मागणी करतो. आज याच मागणीसाठी पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. कॅमेरा पुरणार नाहीत इतके हिंदू आज या मोर्चाला जमले आहेत.

धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर राजकारण करू नका. त्यासाठी दुसरे विषय आहेत. मी जनतेला सांगेल की कोणी मंत्री संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्यांच्यावर बहिष्कार टाका. छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा लढले नसते तर आज हिंदू नसते. औरंगजेब समोर झुकले असते तर हिंदू आज सुरक्षित असता का? राज्यातील नेत्यांना मी सांगेल की या गोष्टीचे घाणेरडे राजकरण करू नका. मी धर्मवीर संभाजी महाराजांचा मी भक्त आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यादिवशी बलिदान दिलं तो धर्मवीर दिन म्हणून घोषित करा अशी मागणी राजा भैय्या यांनी यावेळी केली.

लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात लवकरात लवकर एक कायदा करण्यात यावा. जो धर्मांतर करेल त्याला धडा शिकवा. मी पण २००५ मध्ये हेच केलं. त्यामुळे माझ्या भागात धर्मांतर होत नाही. तसेच गणेशोत्सवात ज्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल आहेत. त्यांच्यावरचे केसेस मागे घेतल्या पाहिजे अशी मागणीही राजाभैय्या यांनी यावेळी केली.

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) तसेच महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आवाहन करतो की, त्यांनी याबाबत गंभीर विचार करायला हवा. आज मोठ्या संख्येने बांगलादेशी महाराष्ट्रात घुसत आहे. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो की, यावर काही केलं नाही तर आगामी काळात भयानक परिणाम दिसतील, असंही राजा भैय्या यांनी नमूद केलं असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी पुण्येश्वरच्या आरतीला मी येणार आहे. कारण एक अयोध्या तुमच्या इथं पण आहे. यासाठी राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे. पुणे शहराला पुण्येश्वर मंदिरामुळे ओळख मिळाली. सरकारला मला सांगायचं आहे की, ज्या सरकारला बहुमत हवं, त्यानं पुण्येश्वरला मुक्त करावं. बुलडोझर तयार ठेवा. सगळे हिंदू सरकारसोबत आहे. पुण्यातील पुण्येश्वरजवळ महादेवाचं मंदिर बनवा असंही राजा भैय्या म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT