birthday celebration police Sarkarnama
पुणे

Midnight birthday celebration police : संतापजनक! 'खाकी वर्दी'तील रक्षणकर्त्याचं गुन्हेगारांसोबत मध्यरात्री जंगी बर्थ-डे सेलिब्रेशन

Pune Pimpri Chinchwad police officer midnight birthday celebrating criminals roadside controversy Maharashtra : पुणे इथल्या पिंपरी चिंचवड पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे गुन्हेगारांबरोबर भरस्त्यावर वाढदिवसाचे सेलीब्रेशनाचा व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

Pradeep Pendhare

Pune police viral video : राज्यातील वाढती गुन्हेगारी वेगळ्याच पातळीवर पोचली आहे. बीडमधील राजकीय गुन्हेगारी चर्चेत असतानाच, पोलिस अन् गुन्हेगार कसे एकमेकांच्या हातात-हात घालून असतात, याचे पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधूनल एका घटनेतून समोर आले आहे.

पिंपरी-चिंचवडीमधील सांगवी पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हेगारांबरोबर मध्यरात्री भररस्त्यावर बर्थ-डे सेलिब्रेशन केले. या धांगडधिंग्याचे ड्रोन लावून काढलेले व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सुसंस्कृत पुण्यातील पोलिसांचे गुन्हेगारांबरोबर केलेले या सेलिब्रेशनमुळे बीड पोलिस दलाला देखील मागे टाकले, अशी चर्चा रंगली आहे.

राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवरून पोलिस (Police) दलातील कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित नेहमीच होतात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यापासून, तर पोलिस दलातील कार्यपद्धतीवर संशयच व्यक्त केला जात आहे. आता पुण्यातील पिंपरी चिंचवड इथं सांगवी पोलिस ठाण्यात कर्मचारी प्रवीण पाटील याचा बर्थ-डे गुन्हेगारांनी मध्यरात्री सेलिब्रेशन केल्याचे समोर आले आहे.

या सेलिब्रेशनचे व्हिडिओ ड्रोनद्वारे काढण्यात आले असून, ते समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहे. यामुळे हे सेलिब्रेशन चर्चेत आले आहे. सांगवी पोलिस ठाण्यासमोरच गुन्हेगारांनी (Crime) आयोजित केलेल्या बर्थ-डे सेलिब्रेशनवेळी प्रवीण आणि सहकाऱ्यांनी कोणकोणते नियम खुंटीवर टांगले, याची चर्चा आहेत. या सेलिब्रेशनमधील धांगडधिंगाण्यावर कारवाई झाली पाहिजे, असा सूर उमटला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये रात्री बारा वाजताच्या ठोक्यालाच सांगवी पोलिस ठाण्यासमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली होती. पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन केले. फटाक्यांच्या फायर गणमधून आतिषबाजी करण्यात आली. याचवेळी दुसरीकडे स्काय शॉट आणि आयटम बॉम्ब फुटण्यात आले. ही आतिषबाजी बराचवेळी सुरु होती.

या सर्व सेलिब्रेशनचे चित्रीकरण ड्रोनद्वारे करण्यात आले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा कारभार प्रवीण पाटील याने केलेल्या या प्रतापामुळे चर्चेत आला आहे. रस्ता अडवणे, गुन्हेगारांबरोबर सेलिब्रेशन, रात्री दहानंतर फटाक्यांची आतषबाजी, विनापरवाना ड्रोन उडवण्याचा प्रकारावर पोलिस आयुक्त यावर कोणती कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT