Pooja Dhananjay Jadhav BJP Sarkarnama
पुणे

Pooja Jadhav News : सोशल मीडियाने घात केला! कोण आहेत माघार घ्याव्या लागलेल्या भाजपच्या 'या' महिला उमेदवार?

Pooja Dhananjay Jadhav BJP : पूजा जाधव यांचे पती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस आहे. तसेच ते पुणे महापालिका वृश्र प्राधिकरण समितीचे माजी सदस्य आहेत.

सरकारनामा ब्यूरो

BJP Candidate Withdraws PMC Polls : महापालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता बंडखोरांची समजूत काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू आहे. पण पुण्यात मात्र भाजपवर नामुष्की ओढविली. फुलेनगर-नागपूर चाळ या प्रभाग क्रमांक दोनमधील अधिकृत उमेदवाराला अर्ज मागे घेण्याचे आदेश नेत्यांना द्यावे लागले आहे. पूजा धनंजय जाधव असे या उमेदवाराचे नाव आहे.

पूजा जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या यापूर्वीच्या भूमिकांवरून तीव्र विरोध केल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. आपल्या पूर्वीच्या भूमिकांबाबत जाधव यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिले आहे. आपण सोशल मीडियातील चुकीच्या प्रचाराचा बळी ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

कोण आहेत पूजा जाधव?

पूजा यांचे पती धनंजय जाधव हे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस आहे. तसेच ते पुणे महापालिका वृश्र प्राधिकरण समितीचे माजी सदस्य आहेत. तर पूजा या धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. त्या मुळच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहेत. गेवराई पंचायत समितीच्या त्या सदस्याही होत्या.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी चळवळीतही त्या सक्रीय होत्या. या संघटनेच्या युवती आघाडीच्या त्या प्रदेशाध्यक्षा होत्या. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातही त्या काही काळ सहभागी होत्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

नेमकं काय घडलं?

भाजपने पूजा जाधव यांना उमेदवारी दिल्यानंतर सोशल मीडियात त्यांचे जुने व्हिडीओ व फोटो व्हायरल झाले. भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर सोशल मीडियातून त्यांनी आपली भूमिका मांडली होती. पहेलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर बोलताना माझी अर्धवट प्रतिक्रियेची मोडतोड करून काहीजण व्हायरल करत आहेत. पहेलगाम चा हल्ला हा हिंदूंवर झालेला हल्ला आहे, व त्यानंतर आम्ही तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना मदत केली.

मला भाजपा तर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काहीजणांना पराभव दिसत असल्याने, ते खोटे पसरवत आहेत. याला कृपया कोणीही बळी पडू नये. तसेच मराठा आरक्षण चळवळीत देवेंद्र फडणवीसांचे योगदान मोठे आहे. परंतु दुसऱ्या व्यक्तीचे भाषण मॅार्फ करून व्हायरल केले जात आहे, याबाबत मी रीतसर पोलीस तक्रार दिलेली आहे, असे जाधव यांनी सांगितले होते. पण त्यानंतर काही वेळातच त्यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT