vasant more And uddhav thackeray sarkarnama
पुणे

Vasant More News : पुणेकरांनी थोडा विचार करावा, हे का घडवण्यात आले? वसंत मोरेंनी 18 नावांची यादीच काढली, धक्कादायक दावा...

Vasant More Big Claim : महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल, या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले.

Rajanand More

Pune municipal election : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांचा पुणे महापालिका निवडणुकीत पराभव झाला आहे. हा पराभव मोरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. माजी नगरसेवक असलेल्या मोरे यांनी पराभवाचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडले आहे. महापालिकेत केलेला कारभार बाहेर काढला जाईल, या भीतीने प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे.

वसंत मोरे यांनी सोशल मीडियात याबाबतची पोस्ट करत त्यांच्यासह १८ जणांची यादीच टाकली आहे. या यादीत माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेत्यांसह विविध प्रमुख पदांवर काम केलेल्या नेत्यांचा समावेश आहे. या सर्वांचा निवडणुकीत पराभव झाला आहे. या यादी पोस्ट करत मोरे यांनी पुणेकरांना हे असे का घडविण्यात आले, असा सवाल करत त्याचे उत्तरही दिले आहे.

वसंत मोरे यांच्या या पोस्टची चर्चा होत आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले? याला कारण २०२२ ते २०२६ या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल, या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले. हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केलं.

यादीमध्ये निवडणुकीआधी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी विरोधी पक्षनेते आबा बागुल, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांचाही समावेश आहे. या तिघांचाही पराभव धक्कादायक मानला जात आहे. यादीमध्ये विशाल तांबे माजी स्थायी समिती चेअरमन, अश्विनी कदम माजी स्थायी समिती चेअरमन, संजय भोसले माजी गटनेता यांचाही समावेश आहे.

त्याचप्रमाणे दिपाली धुमाळ माजी विरोधी पक्षनेता, साईनाथ बाबर माजी गटनेता, अशोक हरणावळ माजी गटनेता, शंकर केमसे माजी सभागृहनेता, किशोर शिंदे माजी गटनेता, बाबू वागसकर माजी गटनेता, अविनाश बागवे स्थायी समिती सभासद, नंदाताई लोणकर स्थायी समिती सभासद, योगेश ससाने स्थायी समिती सभासद, नाना भानगिरे स्थायी समिती सभासद, रूपाली पाटील शहर सुधारणा अध्यक्ष यांचेही नाव यादीत आहे. हे सर्वजण जर सभागृहात असते तर यांच्या (भाजप) चार वर्षाच्या पापाचा पाढा सतत बाहेर काढला असता, असे मोरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT