Pune crime news: स्वारगेट येथील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर 70 तासानंतर अटक करण्यात आली. गुनाट (ता.शिरुर) येथील त्याच्या गावी असलेल्या कॅनॉलमध्ये लपून बसलेल्या दत्ताला गावकऱ्यांच्या मदतीने पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज पुणे न्यायालयात सकाळी अकरा वाजता हजर करण्यात येणार आहे. मध्यरात्री 1.20 मिनिटांनी त्याला पोलिसांनी पकडले.
त्यांची वैद्यकीय चाचणी ससून रुग्णालयात पूर्ण झाली असून आज दुपारी त्याला शिवाजीनगर न्यायालयत हजर करण्यात येणार आहे. दत्ता गाडे याला लष्कर पोलिस ठाण्याच्या कोठडीत आहे. गेल्या दोन दिवसापासून गाडे याच्या मागावर पोलिस होते.
गाडेला पकडण्यासाठी पुणे पोलिसाचे 13 पथक तपास करीत होते. डॅाग स्कॅाड आणि ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात येत होता. तो त्यांचा गावी ऊसाच्या शेतात लपून बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यादिशेने पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली. मात्र दत्ता आहे गुनाट गावात त्यांच्या नातेवाईकांच्या घराजवळील एका कॅनॉलमध्ये लपून बसला होता.
तो पाणी पिण्यासाठी त्याच्या नातेवाईकांकडे आला. त्याने पाण्याची बाटली मागतली. मला पोलिसांना शरण जायला पाहिजे होते, माझ्याकडून चूक झाली, असे तो नातेवाईंकाना म्हणाला. त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांनी माहिती दिली.
दोन दिवस दत्ता हा ऊसाच्या शेतात लपून बसला होता. त्यानंतर तो कॅनॉलमध्ये लपला होता. त्याला पकडण्यासाठी गुनाटच्या गावकऱ्यांनी पोलिसांना मदत केली. मंगळवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास स्वारगेटहून फलटणला जाणाऱ्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये नेऊन गाडेने लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर तो फरार होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.