pune police arrest ganesh gaikwad and his father from udupi 
पुणे

डबल मोका लागलेले गायकवाड पितापुत्र अखेर जाळ्यात; उडपीत ठोकल्या बेड्या

पुणे व पिंपरीपोलिस आयुक्तांलयानी ही कारवाई केलेला गायकवाड पितापुत्र एकमेव असावेत. अशी डबल मोक्का कारवाई होऊनही ते सापडत नसल्याने त्यांनी पोलिसांना धक्का दिला, अशी परिस्थिती निर्णाण झाली होती.

सरकारनामा ब्युरो

पुणे : अनधिकृत सावकारकी, खंडणी, सूनेचा छळ, जमीन बळकावणे अशा विविध गुन्ह्यांसाठी  पुणे पोलिसांनी फरार असलेल्या नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaykwad) व त्याचा मुलगा गणेश गायकवाड (Ganesh Gaykwad) यांच्या विरोधात मोक्काची (MOCCA) कारवाई केली होती. या आधी पिंपरी-चिंचवड पोलिसांनीही गायकवाड विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अनेक दिवसांपासून गुंगारा देत असलेल्या या पितापुत्रांना अखेर पोलिसांनी कर्नाटकातील उडपी येथे बेड्या ठोकल्या आहेत. 

पुणे व पिंपरी या दोन्ही पोलिस आयुक्तांलयानी ही कारवाई केलेला गायकवाड पितापुत्र एकमेव असावेत. अशी डबल मोक्का कारवाई होऊनही ते सापडत नसल्याने त्यांनी पोलिसांना धक्का दिला, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पोलिस त्यांचा कसून शोध घेत होते. अखेर हे दोघे पितापुत्र कर्नाटकातील उडपी येथे असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पुणे पोलिसांनी या दोघांनाही तेथून पकडले. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

या कारवाईनंतर गायकवाडच्या संपर्कात असणारे तथाकथित अध्यत्मिक गुरू व राजकीय नेते आता पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत  पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या आधी मोक्काची कारवाई केली होती. त्यानंतर पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनीही तसेच पाऊल उचलले. यात नानासाहेब ऊर्फ भाऊ शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड (सर्व रा.एनएसजी हाऊस, औंध), सोनाली दिपक गवारे (वय 40), दिपक निवृत्ती गवारे (वय 45, दोघेही रा. गजानन महाराज मंदिराजवळ, शिवाजीनगर), राजू दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ (रा.सर्वोदय रेसीडेन्सी, विशालनगर, पिंपळे निलख, मुळ रा. श्रीरामपुर, नगर), सचिन गोविंद वाळके, संदिप गोविंद वाळके (दोघेही रा.विधाते वस्ती, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अवैध खासगी सावकारी केल्याबाबतचे गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. प्रतिष्ठित व महत्वाच्या व्यक्तींशी संबंध निर्माण करून गरजू व्यक्तींना बेकायदेशीरपणे व्याजाने पैसे देत, त्यांच्याकडून मुद्दल, व्याजासह पैसे घेण्याबरोबरच त्यांच्या मालमत्ता बळकावून बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  मोक्कांअंगर्तत कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरीक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला होता. त्यास पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली चव्हाण यांनी मंजुरी दिली. आता पुणे पोलिसांच्या रडारवर अध्यत्मिक गुरू व राजकीय नेते आहेत.  पुणे पोलिसांना गुंगारा देत गायकवाड फरार होते. पोलिसांनी गायकवाडना अटक करण्यासाठी टीम तयार केल्या होत्या. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT