PM Narendra Modi in Pune
PM Narendra Modi in Pune  Sarkarnama
पुणे

धक्कादायक : मोदींना बघायला पुणेकर गेले अन् पोलिसांनी मास्क, सॉक्स अन् शर्टही काढून घेतले

सरकारनामा ब्युरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुणे मेट्रोचे (Pune Metro) उद्घाटन 6 मार्चला झाले. एमआआयटी कॉलेजमधील या कार्यक्रमातील धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. या कार्यक्रमाला गेलेल्या नागरिकांना काळ्या रंगाचे मास्क, सॉक्स अगदी शर्टही पोलिसांना काढून टाकण्यास सांगितले. मोदींच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा निषेध होऊ नये, यासाठी काळ्या रंगाबाबत पोलिसांनी ही सावधगिरी बाळगली होती. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी काळे झेंडे घेऊन जाऊ नयेत, अशी सूचना करण्यात आली होती, असा खुलासा पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावर केला आहे. ही सूचना केवळ काळे झेंडे आणि काळे कापड यापुरती मर्यादित होती मात्र यात अंगावरील कपड्यांचा समावेश नव्हता, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. पोलीस आयुक्तांकडून अशा सूचना असतानाही पोलिसांकडून कार्यक्रमस्थळी झालेल्या त्रासामुळे मोदींना पाहायला गेलेल्या पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यांना काळे सॉक्स, मास्क आणि अगदी शर्टही काढून टाकण्यास सांगण्यात आले. पोलिसांच्या या कृतीमुळे अनेक जण नाराजी व्यक्त करीत होते.

या प्रवासावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या. त्यांच्या सोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. पंतप्रधानांनी तिकीट काढून मेट्रोचा प्रवास केला. या वेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या हस्ताक्षरात अभिप्रायही नोंदवला.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या इमारतीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत मोदी हे शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले. या वेळी मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधानांसाठी बनवलेला खास फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. या मार्गांवरील मेट्रो प्रवाशांसाठी आता उपलब्ध झाली आहे. त्यातील वनाझ ते रामवाडी हा 13 किलोमीटरचा मार्गा असून त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मेट्रो मार्गाचे काम पुर्ण झाले आहे. तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा दूसरा मार्ग आहे. हा 12 किलोमीटरचा मार्ग असून त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटर मार्गाचे कामही पूर्ण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT