Pune Police 
पुणे

Pune Police : चलो बैठो घुमने जाते है..; म्हणणाऱ्या तरुणांना पुणे पोलिसांनी घडवली जेलची हवा...

सोमवारी (५ डिसेंबर) सांयकाळी दोन-तीन तरुणी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी हॉस्टेल बाहेर पडल्या होत्या.

सरकारनामा ब्युरो

Pune Police : फेरफटका मारण्यासाठी हॉस्टेलबाहेर पडलेल्या तरुणींची छेड काढणाऱ्या दोन तरुणांना पुणे पोलिसांनी (Pune Police) इंगा दाखवला. तरुणींनी दिलेल्या तक्रारीनंतर अवघ्या तासाभरातत्या बहाद्दरांचा शोध घेऊन त्यांची फिरायला जाण्याची "छोटीशी ख्वाईश" पोलिसांच्या "लॉक अप" मध्ये पूर्ण केली.

कोथरुड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड परिसरात अनेक शिक्षणसंस्था असल्याने त्याच परिसरात हॉस्टेल्सची संख्यांही भरपुर आहे. त्यामुळे सांयकाळच्या वेळी या परिसरात विद्यार्थी-विद्यार्थीनींचा मोठा वावर असतो. सोमवारी (५ डिसेंबर) सांयकाळी साडेचार-पाचच्या दरम्यान तीन तरुणी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी हॉस्टेल बाहेर पडल्या होत्या. काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारमध्ये बसलेल्या तरुणांनी त्यांना "चलो बैठो घुमने जाते" असा आवाज दिला.

घडल्या प्रकारामुळे दोघीही काही मिनिट भांबावून गेल्या. पण त्यांनी लगेच पोलिसांत तक्रारही केली. तरुणींनी टवाळखोर तरुणांच्या कारचा नंबर लक्षात ठेवला होता. त्यात कोथरुड पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपासाची चक्रे फिरवली आणि तरुणांना अवघ्या तासाभरात ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर थेट कारवाई करून तरुणांच्या आवडीनुसार त्यांना "लॉक अप" च्या थंडगार वातावरणाची सफर घडविली. या प्रकारामुळे तरुणांनाही आपल्या शब्दांचे आणि कृत्याचा पश्चाताप झाला.

"ट्विटर"चा "ट्विस्ट" भलताच भारी !

तरुणींसोबत घडलेल्या या प्रकारची खुद्द पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ही दाखल घेत त्याबाबत मजेशीर ट्विट केलं आहे. पुणे पोलिसांच्या ट्विटरवर याबाबत एक भन्नाट "ट्विट" त्यांनी केल आहे. यात, "चल बैठो घुमने जाते" कोथरूडमध्ये हॉस्टेल बाहेर कारमध्ये बसलेल्या दोघा तरुणांनी 3 मुलींना 'कॅज्युअल' बोललेले शब्द #PunePolice ने मात्र 'कॅज्युअली' घेतले नाहीत. पोलिसांनी तासाभरात कार शोधली आणि तरुणांना ताब्यात घेतले. असे म्हणत, 'This is #Pune. Eve-teasing in any form will land you in big trouble.'' असा शब्दांत त्यांची बोळवण केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT