Pune News : पुणे शहरात सध्या कल्याणीनगर येथे झालेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह अपघात प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच आता पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारुच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणीनगर परिसरात अकरा दिवसांपूर्वी झालेल्या हिट अॅण्ड अपघात (Accident) प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे. तसतसं नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून सध्या शहरातील दारु विक्री करणाऱ्या पब आणि बार वरती पोलिसांची करडी नजर आहे. तसेच एक्साइज विभागाकडून देखील दारु विक्री करणाऱ्या पब आणि हॉटेल वरती कारवाई करण्यात येत आहे. घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात असून काही प्रकरणांमध्ये हॉटेल सील देखील करण्याचे काम केले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या काही दिवसांपासून एका बाजुला अवैध दारु विक्रीला लगाम लावण्यासाठी पोलीस (Police) आणि एक्साइज विभाग विशेष प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे मात्र पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची मात्र आयुक्तालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पोलीस आयुक्तालयाच्या आवारामध्ये सापडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या नंतर पुणे पोलिस आयुक्तालय आवारात दारुच्या बाटल्याआल्या कशा? पुणे पोलिस आयुक्तालयात दारूची पार्टी? पुणे पोलिस आयुक्तालयात दारू कुणी प्याली? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत.यावर पोलीस आयुक्तालयाकडून काय स्पष्टीकरण देण्यात येते हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, या धक्कादायक प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी दखल घेऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.