Nilesh Ghaywal gangster case Sarkarnama
पुणे

Nilesh Ghaywal: नीलेश घायवळच्या मुसक्या आवळण्यासाठी आता ई़डीची एन्ट्री

Nilesh Ghaywal ED Inquiry: ‘ईडी’ला पाठवलेल्या पत्रात घायवळच्या बेनामी व्यवहारांची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे. घायवळ आणि त्याच्या टोळीने विविध गुन्ह्यांद्वारे मिळविलेल्या रकमेचा वापर करून जमीन, घर आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nilesh Ghaywal ED Inquiry: ‘ईडी’ला पाठवलेल्या पत्रात घायवळच्या बेनामी व्यवहारांची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे. घायवळ आणि त्याच्या टोळीने विविध गुन्ह्यांद्वारे मिळविलेल्या रकमेचा वापर करून जमीन, घर आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या मुसक्या आवळण्याच्या सुरवात तपास यंत्रणा करीत आहे. आता या प्रकरणात आता ईडीने एन्ट्री घेतली आहे. नीलेश घायवळ याच्या संपत्तीच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी ईडीला (सक्त वसुली संचालनालय) पत्र पाठवली आहेत.

नीलेश घायवळ याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. धमकी, खंडणी, फसवणूक, मारहाण आणि गुन्हेगारी कट रचणे अशा स्वरूपाचे ११ गंभीर गुन्हे घायवळ याच्यावर दाखल आहेत. त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे.

‘ईडी’ला पाठवलेल्या पत्रात घायवळच्या बेनामी व्यवहारांची माहिती गुन्हे शाखेकडून देण्यात आली आहे. घायवळ आणि त्याच्या टोळीने विविध गुन्ह्यांद्वारे मिळविलेल्या रकमेचा वापर करून जमीन, घर आणि व्यावसायिक मालमत्ता खरेदी केल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे.

पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात घायवळने स्वतःच्या आणि नातेवाइकांच्या नावावर सुमारे ५० ते ५८ एकर जमिनीची खरेदी केली आहे. या जमिनींची किंमत कोट्यवधी रुपये असून, ही मालमत्ता गुन्हेगारी पैशातून खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

नीलेश घायवळच्या नावावर अनेक कोटींची संपत्ती असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पुणे पोलिसांनी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने ही चौकशी करण्यासाठी पत्र पाठवले आहे. या संपत्तीमध्ये जमीन, बंगल्यांचे व्यवहार, तसेच विविध नावांनी स्थापन केलेल्या शेल कंपन्या यांचा समावेश असल्याचा संशय आहे. प्राथमिक तपासानुसार, ही संपत्ती त्याच्या गुन्हेगारी कारवायांतून जमवण्यात आल्याचे सूचित होते.

नीलेश घायवळ कोण आहे?

नीलेश घायवळ हा पुण्यातील प्रसिद्ध गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो. गेल्या दशकात त्याच्यावर खंडणी, मनी लाँडरिंग, भूमी व्यवहारातील फसवणूक, आणि हत्येच्या कटात सहभाग यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या टोळीने पुणे व आसपासच्या भागात अनेक जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याची तक्रार देखील स्थानिक नागरिकांनी केली होती.

आतापर्यंत काय घडले?

पुण्यातील कोथरूड, वडगाव आणि औंध परिसरातील ठिकाणांवर ईडीचे छापे टाकण्यात आले. काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. ईडीच्या मते, या पुराव्यांमुळे आणखी काही राजकीय आणि व्यावसायिक संबंध उघड होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT