Dheeraj Ghate
Dheeraj Ghate 
पुणे

नगरसेवक धीरज घाटे यांच्या खूनाचा कट उघड : गुन्हा दाखल

सरकारनामा ब्यूरो

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेकदा चुरशीच्या होतात. पुण्यातील निवडणुकांत अनेकदा वैमनस्य दिसून आले. मात्र निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच आपल्या विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. भाजपचे नगरसेवक व माजी सभागृह नेते धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या खूनाचा कट उघडकीस आल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी विकी ऊर्फ वितुल वामन क्षीरसागर, मनोज संभीजी पाटोळे (रा. सानेगुरूजी नगर आंबीलओढा कॉलनी) या दोघांसह त्यांच्या तीन ते चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  घाटे (वय 46, रा.स्नेहनगर, निलायम टॉकीजवळ) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शास्त्री रस्त्यावरील असलेल्या शेफ्रॉन हॉटेल परिसरात घडली.

धर्मरक्षक प्रतिष्ठानचे म्हणून क्षीरसागर कुटुंब काम पाहतात. तसेच घाटे यांच्याही ते नजिकचे समजले जात होते. 2017 पर्यंत ते घाटेंच्या जवळ होते. त्यानंतर त्यांच्यात कटुता निर्माण झाली. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत आपला भाऊ राकेश क्षीरसागर हा सहज निवडून यावा म्हणून चार ते पाच साथीदारांना एकत्र करून घाटे यांच्या खूनाचा कट रचल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

घाटे हे दोन दिवसांपूर्वी हाॅटेलमध्ये असताना त्यांना या मंडळींची संशयास्पद हालचाल दिसली. त्यानंतर त्यांनी हाॅटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता विपूल व त्याचे साथीदार एका बॅगेसह सज्ज असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना भेटून हा प्रकार सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT