Sharad Pawar Meet Kakade Family Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : शरद पवारांनी 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकांची भेट !

Kakade family contested many elections against Sharad Pawar : 55 वर्षांनंतर शरद पवार हे काकडे कुटुंबीयाला भेटले, पवारांच्या विरोधात काकडे कुटुंबाने लढविल्या अनेक निवडणुका

Chaitanya Machale

Pune Political News : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या माजी खासदार कै. संभाजीराव काकडे, कै. बाबालाल काकडे यांच्या कुटुंबीयांची शुक्रवारी भेट घेतली. मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष शामराव काकडे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. 55 वर्षांनंतर शरद पवार हे काकडे कुटुंबीयाला भेटले आहे.

खासदार संभाजीराव काकडे कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहेत. पवार यांचे राजकारणातील प्रतिस्पर्धी अशी ओळख काकडे यांची होती. शरद पवार यांची राजकीय भूमिका तसेच राजकीय मते पटत नसल्याने अनेकदा काकडे यांनी पवार यांच्या विरोधात अनेकदा जाहीर मते मांडून विरोधाची भूमिका घेतली होती. शरद पवार यांच्या विरोधात काकडे यांनी अनेक वेळा खासदारकी आणि आमदारकीदेखील लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या अनेक वर्षांपासून काकडे विरुद्ध पवार हा संघर्ष सर्वांनाच ज्ञात आहे. जिल्हा परिषद, (ZP) पंचायत समितीपासून आमदार, खासदारकी तसेच जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, बाजार समिती यामध्येदेखील पवार यांच्या विरोधात कडक भूमिका घेत काकडे कुटुंबीयांनी लढा दिला आहे. पवार यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी अशी ख्याती काकडे यांची होती. त्यामुळे ते एकमेकांचे तोंडदेखील पाहत नव्हते.

तीन वर्षांपूर्वी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन झाले आहे. त्यावेळी त्यांचे कट्टर विरोधक असलेले शरद पवार यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. 'माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्त्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले. शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!'अशा शब्दांत पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

गेल्या पाच वर्षांपासून उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काकडे कुटुंबीयांशी जुळून घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांचे सुपुत्र अभिजित काकडे यांना त्यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर संधीदेखील दिली आहे.

माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काकडे कुटुंबाचे सांत्वन करत भेट घेतली. तब्बल 55 वर्षांनी पवार यांनी काकडे कुटुंबीयांची भेट घेतली आहे. शामराव काकडे यांच्या निवासस्थानी पवार यांनी ही भेट घेतली. या वेळी काकडे कुटुंबातील सतीश काकडे अभिजित काकडे यांच्यासह काकडे परिवर्तन अनेक जण उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी ही भेट घेतली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT